Myositis Disease : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ज्याच्याशी लढत आहे तो 'मायोसिटिस' म्हणजे काय? वाचा सविस्तर

Samantha Ruth Prabhu Myositis Illness : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने खुलासा केला आहे की तिला मायोसिटिस नावाचा आजार झाल्याचे निदान झाले आहे.
Samantha Ruth Prabhu Myositis Illness
Samantha Ruth Prabhu Myositis Illness Dainik Gomantak
Published on
Updated on

Samantha Ruth Prabhu Myositis Illness : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने खुलासा केला आहे की तिला मायोसिटिस नावाचा आजार झाल्याचे निदान झाले आहे. तिच्या आगामी 'यशोदा' चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तिच्या चाहत्यांचे आभार मानत, अभिनेत्रीने तिच्या आजाराबद्दल Instagram माहिती दिली.

समंथाने लिहिले की, 'यशोदाच्या ट्रेलरवर तुमची प्रतिक्रिया जबरदस्त होती. हे प्रेम आणि कनेक्शन आहे जे मी तुम्हा सर्वांसोबत सामायिक आहे आणि तेच मला जीवनातील अंतहीन आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य देते. (Samantha Ruth Prabhu Myositis Illness)

Samantha Ruth Prabhu Myositis Illness
Hair Oil Astrology : काय सांगता? या दिवसात तेल लावल्याने तिजोरी होऊ शकते रिकामी; शास्त्रानुसार...

हॉस्पिटलचा फोटो शेअर करत सामंथाने लिहिले की, 'काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार झाल्याचे निदान झाले. समंथा म्हणाली की, तिच्या डॉक्टरांना विश्वास आहे की ती लवकरच पूर्ण बरी होईल. ती म्हणाली, 'माझ्या आयुष्यात चांगले-वाईट दिवस आले आहेत...शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या...आणिमला माहिती आहे की तो क्षणही निघून जातो. ही वेळही निघून जाईल.

मायोसिटिस म्हणजे काय?

मायोसिटिस ही एक स्वयंप्रतिकार स्थिती मानली जाते ज्यामध्ये शरीराच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होतो. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये स्नायू दुखणे, थकवा येणे, खाणे-पिणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश होतो. पुरुषांपेक्षा महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो आणि मुलांवरही याचा परिणाम होऊ शकतो.

पाच प्रकारचे मायोसिटिस आणि त्यांची लक्षणे

मायोसिटिसचे पाच प्रकार आहेत: - डर्माटोमायोसिटिस, इन्क्लुजन-बॉडी, जुवेनाईल मायोसिटिस, पॉलीमायोसिटिस आणि टॉक्सिक मायोसिटिस.

मायोसिटिसचा उपचार

मायोसिटिससाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही. तथापि, कॉर्टिकोस्टिरॉईड्स नावाच्या औषधांचा एक वर्ग डॉक्टरांनी लिहून दिला आहे. हा एक स्वयंप्रतिकार रोग असल्याने, इम्युनोसप्रेसंट औषधे देखील वापरली जातात. स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक उपचार, योगासन आणि व्यायामाचे इतर प्रकार देखील वापरले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com