Rose Day: नात्यात सुसंवाद अन् प्रेम टिकवून ठेवण्यासाठी करा गुलाबाचे 'हे' उपाय

नात्यात सुसंवाद आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा वापर करू शकता.
Valentine's Day
Valentine's DayDainik Gomantak
Published on
Updated on

rose day valentine week astrological remedies increase love partner

दरवर्षी 7 फेब्रुवारी रोजी रोज डे सह व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. ज्योतिषशास्त्रात नातं मजबूत करण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा कसा वापर हे सांगतिले आहे. हे उपाय केल्यास नात्यातील गोडवा अधिक वाढेल.

ज्योतिषीय गुलाबाचे कोणते उपाय करावे

तज्ज्ञांच्या मते तुम्ही राधा-कृष्णाच्या मंदिराला भेट द्या आणि व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुमच्या जोडीदारासह राधा-कृष्णाच्या मूर्तीवर गुलाबाचे फूल अर्पण करा.

त्यानंतर, ते गुलाबाचे फूल तुमच्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या बेडरूमच्या कपाटामध्ये ठेवा. असे मानले जाते की हे तुमचं नातं सुधारते, ते मजबूत करते आणि तुमचा परस्पर समन्वय वाढवते.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नात्यात कटूता वाढत आहे आणि तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी भांडत असाल तर तज्ज्ञांच्या मते तुम्हाला तुमच्या जोडीदाराला तुमच्यावर गुलाब फेकण्यास सांगावे लागेल आणि नंतर ते जाळून टाकावे आणि राख झाडाच्या मातीत पुरावी लागेल. हे तुमच्या नात्यातील वाईट नजरेचे परिणाम दूर करेल. तसेच, हे तुमच्या नात्यातील नकारात्मकता दूर करते असे मानले जाते.

तुमचं नातं सुधारण्यासाठी, तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू किंवा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या चरणी गुलाब अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो.

याशिवाय तुम्ही दुसरा उपायही करू शकता. व्हॅलेंटाईन डे वर पाच गुलाब गंगेच्या पाण्यात बुडवावे. दुसऱ्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय तुमच्या पसंतीच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी, वैवाहिक नात्यात गोडवा वाढवण्यासाठी आणि वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्यासाठी प्रभावी ठरेल असे मानले जाते.


(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com