Reuse: कुशन कव्हर जुने झाले असेल तर असा करा पुन्हा वापर

तुमच्या घरी देखील जुने कुशन कव्हर असेल तर त्याचा या विविध कामांसाठी वापर करू शकता.
cushion cover
cushion cover Dainik Gomantak

Reuse Cushion Cover: जुन्या आणि खराब झालेल्या कुशन कव्हर्स तुम्ही फेकून देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्ही जुने कुशन कव्हर्स वेगवेगळ्या कामांसाठी वापरू शकता. जुन्या कुशन कव्हर्सने काय करता येईल पुढील प्रमाणे जाणून घेऊया.  

सॉफ्ट टॉय

  • जुने कुशन कव्हर फेकून देण्याऐवजी तुम्ही सहज सॉफ्ट टॉय बनवू शकता. तुम्हाला सॉफ्ट टॉय पाहिजे त्या आकारात कव्हर कापू शकता.

  • आता घरात असलेले खराब झालेले कपडे लहान तुकडे करा आणि ते टॉयमध्ये टाकावे आणि नंतर ते शिवून घ्यावे. असे केल्याने तुमचे खेळणे तयार होईल. 

पिशवी बनवू शकता

  • तुम्ही जुन्या कुशन कव्हर्सपासून पिशवी देखील बनवू शकता. अनेक वेळा कव्हरचा छोटासा भाग फाटला जातो, तो दुरुस्त करून तुम्ही पिशवीचा आकार देऊ शकता.

  • या पिशवीचा वापर विविध कामांसाठी करू शकता. मुलांचे जुने पुस्तक किंवा इतर सामान ठेऊ शकता. यामुळे तुमचे काम पूर्ण होईल आणि जास्त खर्चही होणार नाही. 

पडदे बनवू शकता

  • तुमच्या घरात जर लहान खिडकी किंवा जागा असेल जिथे पडदा लावता येईल, तर तुम्ही कुशन एकत्र करून पडदा बनवू शकता.

  • यासाठी तुम्हाला फक्त कुशन कव्हरचे योग्य भाग जोडून  पडद्याचा आकार द्यावा लागेल.

पायपुसणी बनवू शकता

  • तसेच तुम्ही जुन्या कुशन कव्हरपासून लहान तुकडे करून पायपुसणी देखील बनवू शकता.

  • कुशन कव्हरपासून पायपुसणी अगदी सहज बनवता येते. हे केल्यानंतर तुम्हाला घरासाठी डोअरमेटसाठी खर्च करावा लागणार नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com