Restaurants in Goa: 'सिनामोन'ची भाटकार थाळी

नावेलीच्या तुलनेत मडगावमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यातलाच अगदी खात्रीलायक पर्याय पुढे आला तो मोंत हिलवरील 'सिनामोन ' रेस्टोरंटचा. सर्वाना गरम गरम जेवण मिळू शकेल असं हे रेस्टोरंट आहे.
Restaurants in Goa: 'सिनामोन'ची भाटकार थाळी
Dainik Gomantak
Published on
Updated on

भाटकार म्हणजे जमीनदार, लँड लॉर्ड. सिनामोनवर खवय्यांनी आपल्याला पसंतीचा वर्षाव केला. मग अशा खवय्यांना अजून काही तरी चांगलं नाविन्यपूर्ण द्यायला हवं या उद्देशाने नव्या थाळीची निर्मिती झाली.

गेल्यावर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात नावेली मतदारसंघात निवडणूकपूर्व सर्व्हेचं काम सुरू होतं. वीस - बावीस जणांची टीम फिल्डवर्क करत होती. फिल्डवर्कला गेल्यावर या सर्व टीमची जेवणाची सोय लावणं अतिशय कटकटीचं काम होऊन जातं. एवढ्या मोठ्या टीमला जेवायला घेऊन गेल्यावर सर्वाना बसायला जागा मिळणं, सर्वाना वेळेवर जेवायला मिळणं आणि वेळेवर जेवण संपवून परत कामाला सुरुवात करणं, हें वेळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय जिकिरीचं होऊन जातं. नावेलीमध्ये एकच उडपीचं हॉटेल आहे. एका आठवड्याच्या फिल्डवर्कमध्ये सगळेजण त्या उडपीकडे जेवून कंटाळले. उडपी रेस्टोरन्टमधील शाकाहारी थाळी खाऊन सगळ्यांना कंटाळा आला होता. पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शेवटच्या दिवशी अर्धा दिवसाचं काम होतं त्यामुळे मडगावमध्ये कुठेतरी चांगलं जेवण देण्याचं ठरवलं.

Restaurants in Goa: 'सिनामोन'ची भाटकार थाळी
Restaurants In Goa: 'राईथ' नव्या जुन्याचा संगम

नावेलीच्या तुलनेत मडगावमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यातलाच अगदी खात्रीलायक पर्याय पुढे आला तो मोंत हिलवरील 'सिनामोन ' रेस्टोरंटचा. सर्वाना गरम गरम जेवण मिळू शकेल असं हे रेस्टोरंट (Restaurants in Goa) आहे. उन्हात फिल्डवर्क करून आलेले आमचे सर्व्हेअरदेखील सिनामोनमध्ये येऊन खुश झाले. वाळवंटातील उंटाला जसं पाणी मिळाल्यावर सुख वाटतं तसं आमच्या या साऱ्या फिल्डवर्कर्सना सिनामोनची 'फिश करी -राईस' थाळी बघून सुख म्हणजे काय असतं ते समजलं. गेले काही दिवस उडप्याचे 'शिवराक' जेवून आमचं पोट खराब झालंय असं काहीजण थट्टेनं सांगत होते. समोर गरम गरम फिश करी थाळी आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात म्हणता येणार नाही तर सर्वांचा जीव 'फिश करी'मध्ये पडला. इतका वेळ चिवचिव करणाऱ्यांचा आवाज बंद झाला आणि जो तो आपल्या ताटात वाढलेल्या नुस्त्यांवर ताव मारण्यात दंग झाला.

मडगावातील मोंत हिलवरील गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये 'सिनामोन' रेस्टोरंट आहे. अतिशय कमी कालावधीत या रेस्टोरंन्टने खवय्यांच्या मनात स्थान निर्माण केलंय. सिनामोन रेस्टोरंन्टचा सर्वत्र गाजावाजा झाला तो त्यांनी सुरू केलेल्या ' भाटकार थाळी ' आणि 'मुंडकार थाळी' मुळे. आजवर विविध प्रकारच्या 'फिश थाळी' खाऊन बघितल्या होत्या पण 'भाटकार' आणि 'मुंडकार' असं थाळीचं नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं. भाटकार आणि मुंडकार या नावांवरून थाळीचा अंदाज बंधू शकले. पण आम्ही सर्वांनी साधी 'फिश करी राईस' थाळीच मागवली. सिनामोनमध्ये शिरताच या रेस्टोरंन्टचे सर्वेसर्वा म्हणजेच मालक साई राजाध्यक्ष भेटले. साई राजाध्यक्ष हे अतिशय उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. सिनामोनमध्ये ते कधी काउंटरच्या पलीकडे बसलेले दिसणार नाहीत. प्रत्येक टेबलवर जाऊन प्रत्येकाला हवं नको ते स्वतः बघत असतात. सांस्कृतिक - सामाजिक आणि विशेष म्हणजे राजकीय विषयात रुची असल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाशी ते तसा संवाद साधतात.

भाटकार म्हणजे जमीनदार, लँडलॉर्ड. सिनामोनवर खवय्यांनी आपल्याला पसंतीचा वर्षाव केला. मग अशा खवय्यांना अजून काही तरी चांगलं नाविन्यपूर्ण द्यायला हवं या उद्देशाने नव्या थाळीची निर्मिती झाली. ही नवी थाळी म्हणजे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या मासळीचा समावेश करण्यात आला. खवय्या मंडळींना एकाच थाळीत सर्व प्रकारचे नुस्ते खायला मिळायला पाहिजे हाच या थाळीच्या निर्मिती मागचा हेतू होता. थाळीत एकूण २७ प्रकारचे पदार्थ दिले जातात. फिशकरी राइस तर महत्त्वाचं पण यात याशिवाय चिकन - मटणाचे प्रकारही दिले जातात. जे मासळी खात नाहीत त्यांना चिकन - मटण हा पर्याय आणि जे चिकन -मटण खात नाहीत त्यांना ताजी ताजी मासळी हा पर्याय इथे आहे. याशिवाय तिसऱ्याचे सुके, तिसऱ्याचे धबधबीत, प्रॉन्स डांगर, कुल्ल्यांचे तोणाक, सुक्या सुंगटाची किसमूर, कुल्ल्यांचे शेक शेक, लेपांचे आंबट तीख, स्टफ्ड रेशाद माणक्यो, भरिल्लो बांगडो, विसवणाची पोस्तं, काफ्रियाल मसाल्याने भरलेलं पापलेट, बांगड्याची उडदामेथी, असे असंख्य प्रकार बघूनच तोंडाला पाणी सुटतं. एक थाळी चारजण खाऊ शकतील इतके यात पदार्थ असतात. कोणत्याही वाटीत हात घाला आणि रुचकर जेवणाचा आनंद लुटा, असा हा थाळीचा प्रकार आहे. गोव्यातील घराघरात बनवल्या जाणाऱ्या साऱ्या पदार्थाना या थाळीत सामावून घेण्यात आलं आहे. यात तिखट, आंबट, गोड अशा प्रकारची चव घेता येते. आकाराने मोठी असलेली मासळी छान चरचरीत तळून वाढली जाते तशी अतिशय चविष्ट लागणारी छोटी मासळी देखील छान चरचरीत तळून वाढली जाते. ही चरचरीत गरम गरम मासळी खाताना रुचकर लागते.

Restaurants in Goa: 'सिनामोन'ची भाटकार थाळी
Restaurants in goa: खास असे 'नवतारा'

इथे अनेकांना 'भाटकार' थाळी जेवताना बघितलंय. कधी दोघेजण तरी कधी तिघे किंवा चारजण मिळून ही थाळी संपवतात. खाणाऱ्याच्या मर्यादा असतात. एकटी व्यक्ती ही थाळी संपवू शकत नाही. पण तुमच्या सोबत कोणी असले तर दोघे - तिघे मिळून निश्चित आरामात जेवू शकता. शिवाय एकच ताटात इतके वेगवेगळे पदार्थ कधीच मिळणार नाहीत. गोमंतकीय नुस्त्यांच्या पदार्थांची ओळख जर कोणाला करून द्यायची असेल तर या थाळीइतकी दुसरी कोणतीच चांगली थाळी मिळणार नाही. आजवर अनेकदा सिनामोनमध्ये जाणं झालंय. पण भाटकर थाळी सोडून मी साधीच थाळी खाणं पसंत करते कारण एवढे पदार्थ एकावेळी खाणं जमत नाही. ज्यांना भाटकार थाळी नको त्यांना साधी फिशकरी राइस थाळी इथे मिळू शकते. ती देखील अतिशय रुचकर असते. या साध्या थाळीतदेखील तीन चार प्रकारची मासळी असतेच. या दोन्ही थाळी इथे फक्त दुपारच्या जेवणात मिळतात. दुपारी इथे थाळी खाण्यासाठी भरपूर गर्दी होते. पण बसायला भरपूर जागा असल्यामुळे जास्त वेळ वाट बघावी लागत नाही. या थाळीव्यतिरिक्त तुम्ही पंजाबी पद्धतीची रोटी-सब्जी मागवू शकता, चिकनचे वेगवेगळे प्रकार इथे मिळतात. थाळी पलीकडेदेखील इथं खाण्यासारखे खूप काही आहे. खवय्या मित्र मैत्रिणीसोबत भरपेट नुसते खायचे असतील तर हे ठिकाण त्यासाठी अतिशय योग्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com