26 January Rangoli Designs: 'या' खास रांगोळ्या काढून साजरा करा यंदाचा प्रजासत्ताकदिन

प्रजासत्तकदिनानिमित्त घरी किंवा ऑफिसमध्ये झटपट रांगोळी काढायची असेल तर या रांगोळी डिझाइन्स तुमच्यासाठीच आहेत.
Republic Day Rangoli Designs
Republic Day Rangoli DesignsDainik Gomantak
Published on
Updated on

26 January Rangoli Designs: 'प्रजासत्ताक दिन' दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतीय मोठ्या थाटामाटात साजरा करतात. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. या विशेष प्रसंगी सर्वत्र तिरंग्याची सजावट केली जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. अनेक कार्यक्रमात रांगोळी काढली जाते. जर तुम्हालाही या खास दिवशी तुमच्या घरी रांगोळी काढायची असेल ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

तिरंगा रांगोळी

वेगळा संदेश द्यायचा असेल तर रांगोळीत सुंदर तिरंगा काढू शकता. ही अगदी वेगळी डिझाइन आहे. विशेषत: तुमचे मूल एखाद्या कार्यक्रमात सहभागी होत असेल तर तुम्ही त्यांना या डिझाइनची रांगोळी कशी काढायची ते दाखवू शकता. असे केल्याने त्यांच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल आदर वाढेल. शिवाय ते अगदी सहज बनवले जाईल.

तांदूळ रांगोळी डिझाइन

तुम्ही तांदूळ तिरंग्या तीन रंगामध्ये रंगवू शकता. गोलाकारात रंगीत तांदुळाची डिझाइन काढू शकता. ही एक वेगळी डिझाइन आहे. तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये काढू शकता.

Republic Day Rangoli Designs
Republic Day Rangoli DesignsDainik Gomantak

भारताचा नकाशा बनवा

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही रांगोळीमध्ये भारताचा एक सुंदर आणि आकर्षक नकाशा देखील बनवू शकता. ज्यामध्ये तुम्ही केशरी, हिरवा आणि पांढरा रंग भरू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला हवे असल्यास त्याभोवती दिवे लावू शकता. रांगोळीत रंगांऐवजी फुलांचाही वापर करू शकता.

मोराची रोंगोळी

रांगोळीत तुम्ही तीन रंगांचा मोर देखील काढू शकता. मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. तसेच ही डिझाइन अतिशय आकर्षक दिसते. ऑफिस, शाळा, कॉलेजमधील कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही ते सहज बनवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com