Republic Day 2024: 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर ठेपला आहे. हा आपल्या देशाचा दुसरा राष्ट्रीय सण आहे, जो संपूर्ण देश आनंदाने साजरा करतो. यानिमित्त देशभरात राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.
तसेच, आता लोक हा सण अधिक खास आणि चांगल्या पद्धतीने साजरा करतात. सोशल मीडियावर पाहिल्याप्रमाणे, लोकांनी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन तिरंगा थीममध्ये साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
मेक-अप, ड्रेस आणि खाण्यापिण्यापासून इतर अनेक गोष्टींपर्यंत तिरंग्याने साजरा केला जातो. तुम्हीही ट्राय कलर थीममध्ये काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर पुढील डेझर्ट तयार करू शकता.
खोबऱ्याचे लाडू
खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी कढईत खोबरे मंद आचेवर भाजून घ्यावे.
नंतर दूध, खवा आणि साखर मिक्स करून चांगले शिजवून घ्या.
लाडू शिजले की त्यात ड्रायफ्रुट्स टाकावे.
लाडूच्या मिश्रणाचे तीन भाग करा आणि दोन भागांमध्ये फूड कलर मिक्स करावे.
एका रंगात केशरी आणि दुसर्यामध्ये हिरवा रंग एकत्र करून नीट मिक्स करून गोल लाडू बनवा.
उरलेल्या पांढऱ्या मिश्रणातून लाडू बनवा आणि एका ट्रेमध्ये तीनही रंगांचे लाडू सर्व्ह करा.
हलवा
हलवा हा नेहमीच आपल्या सर्वांच्या घरात बनवला जातो, त्यामुळे २६ जानेवारी खास बनवण्यासाठी हा पदार्थ तयार करू शकता.
हलवा बनवण्यासाठी कढईत एक वाटी तूप टाकून गरम करा.
तूप गरम झाल्यावर त्यात २ वाट्या रवा घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे.
रव्याचे पीठ भाजल्यावर त्यात चवीनुसार साखर व विलायची पूड घालावी.
हलवा चांगला शिजल्यावर आणि पाणी सुकल्यावर त्याचे तीन भाग करा.
एका भागात हिरवा फूड कलर आणि दुसऱ्या भागात ऑरेंज फूड कलर घाला.
एक भाग पांढरा राहू द्यावा
फूड कलर नीट मिक्स केल्यानंतर तिन्ही भाग साच्यात किंवा भांड्यात ठेवा.
हलवा एकावर एक ठेवा, ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.