Republic Day 2024: 26 जानेवारीला परेड पाहण्यासाठी 'असे' करा ऑनलाइन तिकिट बुक

Republic Day 2024: 26 जानेवारी हा दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्हाला परेड पाहायची असेल तर ऑनलाइन तिकिट कसे बुक करावे हे जाणून घेऊया.
Republic Day 2024
Republic Day 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Republic Day 2024: 26 जानेवारी हा दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली आणि हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीतील विजय चौकातून सकाळी दहा वाजता प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होईल. हे पाहण्यासाठी लोक मोठ्या उत्साहाने जातात. परेड पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना सकाळी 9:30 पर्यंत पोहोचावे लागते. यामुळे तुम्ही घरी बसून ऑनलाइन सीट बुक करू शकता.

ऑनलाइन तिकीट कसे बुक कराल

सर्वात पहिले तुम्हाला संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट www.aaamantran.mod.gov.in ओपन करावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, आधार आयडी सारखे डिटेल्स टाकावे लागतील.

त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकावा.

तुम्ही आधार आयडी टाकताच, सर्व वैयक्तिक तपशील आपोआप पेजवर फेच होईल.

आता वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या बुक तिकीट पर्यायावर जा आणि नंतर ड्रॉपडाउन मेनूमधून BTR फुल ड्रेस रिहर्सल, रिपब्लिक --- डे परेड आणि बीटिंग द रिट्रीट पर्यायांपैकी एक सिलेक्ट करा.

पडताळणीसाठी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी लागेल आणि मूळ फोटो आयडी अपलोड करावा लागेल.

ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर, तुमचे तिकीट बुक होईल.

अशा प्रकारे ऑफलाइन तिकिटे खरेदी करा

सर्वात पहिले प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अधिकृत ऑफलाइन आउटलेट किंवा तिकीट काउंटरवर जावे.

यानंतर ओळखीचा पुरावा द्या आणि नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर यासारखे वैयक्तिक माहिती भरावी.

यानंतर पर्यायातून इव्हेंट सिलेक्ट करा. या पर्यायांमध्ये BTR फुल ड्रेस रिहर्सल, प्रजासत्ताक दिन परेड आणि बीटिंग द रिट्रीट यांचा समावेश असेल.

इव्हेंटमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीचे तपशील आणि पडताळणीसाठी मूळ फोटो आयडीचा फोटो द्यावा.

पेमेंट करा आणि तुमचे तिकीट बुक करा.

ऑफलाइन तिकिटे IDTC ट्रॅव्हल काउंटर, भारत सरकारचे पर्यटन कार्यालय आणि DTDC काउंटरवर उपलब्ध असतील. याशिवाय विभागीय विक्री काउंटरवर सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत तिकिटांची विक्री केली जाईल. संसद भवनाच्या स्वागत कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत तिकीटांची विक्री केली जाईल. प्रजासत्ताक दिनाची परेड घरी बसून पाहायची असेल तर दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनेलवर किंवा प्रेस ब्युरो ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही या परेडचे दूरदर्शन टीव्हीवर थेट प्रक्षेपणही पाहू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com