5 Relationship Tips: आयुष्यात एकदा तरी प्रत्येक व्यक्तीला खरं प्रेम होतेच. प्रेमामध्ये एवढी ताकद असते असते की तो व्यक्ती काहीही करायला तयार असतो.
इतकं की तो एक माणूस मिळवण्यासाठी सगळ्या जगाशी लढायला तयार होतो.
अशा स्थितीत ब्रेकअप हा एक धक्काच असतो. ज्यामध्ये एखादी व्यक्ती वेड्यासारखी वागणुक करू लागते, ज्याने आपल्या प्रेमाची कधीच कदर केली नाही. पण काही दिवस गेल्यावर सर्व ठिक होते.
पण जेव्हा तुम्ही तुमच्या एक्स प्रियशीला विसरून तुमच्या आयुष्यात पुढे जात असता आणि पुन्हा 'तिचा' कॉल किंवा मॅसेज येतो, तेव्हा पुन्हा काही काळ सगळं थांबतं.
'सॉरी' म्हणण्यापासून ते 'मी तुला विसरु शकत नाही', तिच्याकडून आलेला प्रत्येक शब्द तुमचे मन सुन्नं करुन टाकू शकतो. अशावेळी काय करावे किंवा काय नाही हे ठरवण्यासाठी पुढिल टिप्स तुम्हाला मदत करु शकतात.
उत्तर देण्यासाठी वेळ घ्यावा
जर अनेक वर्षांनंतर जुनं प्रेम पुन्हा समोर उभं राहिलं तर एकत्र घालवलेले सगळे क्षण एकदम डोळ्यासंमोर येउ लागतात. त्या व्यकितीने जर पुन्हा तुमच्या आयुष्यात येणासाठी मागणी केली तर लगेच तयार होउ नका स्वत:ला थोडा वेळ द्यावा.
कोणता वाद झाला होता तो आठवा
कोणतेही नाते एका दिवसात किंवा एका भांडणात संपत नाही. मग नात्याला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी असो किंवा एक्स व्यक्तीसोबतच्या नात्यात परत येण्यासाठी, जुने भाडंण एकदा लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात त्या व्यक्तीसोबत तुम्ही किती आनंदी राहाल हे मनात अगदी स्पष्ट होते.
हे नेहमी लक्षात ठेवा की वयानंतर काही दोष माणसाच्या सवयीमध्ये बदलतात. ज्या अनेक वेळा तो स्वत: इच्छा करूनही बदलू शकत नाही. विशेषत: ज्या गोष्टी मानसिक आहेत. अशावेळी तुमचे माजी तुम्हाला कितीही बदलले आहेत असे वाटले तरी, या आधारावर कोणताही निर्णय घेऊ नका.
ब्रेकअपचे कारण लक्षात घ्यावे
तुम्हाला ती शेवटची भेट आठवते का ज्यानंतर तुमच्या एक्सने तुम्हाला पुन्हा कधीही न भेटण्याचे वचन दिले होते? किंवा तिला तुझ्यासारखी हजारो पोरं सापडतील याची आठवण करून दिली किंवा जेव्हा ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेण्याचे धाडस करू शकली नाही.
एक्स पुन्हा आल्यावर या सर्व गोष्टींचा पुन्हा विचार करा आणि तुमच्या नात्यातील त्या गोष्टींचाही विचार करा ज्या आजपर्यंत तुम्हाला प्रेमावर विश्वास ठेवण्यापासून रोखतात.
तुमच्या संध्याच्या जोडीदाराच्या भावनांचा विचार करा
तुमच्या एक्सला तुमच्या आयुष्यात पुन्हा स्थान देण्यापूर्वी, तुमच्या सध्याच्या जोडीदाराच्या भावनांचा नक्कीच विचार करा. कारण त्या व्यक्तीने तुम्हाला कठिण परिस्थित भावनिक आधार दिलेला असतो.
होकार! देण्यामागे मोठे कारण असावे
फक्त भावनेच्या आहारी जाऊन नात्यासाठी तुमच्या एक्सला कधीही होकार देउ नका. कारण यामुळे तुम्हाला पुन्हा पश्चातापाची वेळ येऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.