जर तुमच्या घरातील वातावरण असे असेल की लोक सतत आपापसात भांडत राहतात, वाद झाल्यास लवकर संपत नसेल, शिवीगाळही होत असेल, तर अशा वातावरणात तुम्ही आनंदी राहू शकत नाही.
यामुळे फक्त तणाव वाढतो आणि काहीवेळा तो तुम्हाला नैराश्याचा बळी देखील बनवू शकतो. स्वतःला अशा परिस्थितीत येण्यापासून रोखण्यासाठी, परिस्थिती कशी हाताळायची हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही पुढील टिप्सची मदत घेऊ शकता.
स्वतःला शांत ठेवण्यासाठी काय करावे
वाद होईल असे विषय टाळा
घरात आधीच एखाद्या विषयावर वाद-विवाद सुरू असतील, तर तेथे असे मुद्दे काढणे टाळा, ज्यामुळे आणखी वाद होईल. कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने बोलू नका. या पक्षपातीपणामुळे प्रकरण वाढू शकते. सकारात्मक आणि योग्य गोष्टींसह परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करा.
काही गोष्टींना वेळेवर सोडावे
घरातील किंवा नात्यातील काही वाद लगेच सोडवण्याएवजी कधी कधी वेळेवर देखील सोडावे. कारण काही गोष्टी जस-जसा वेळ जातो तसतशा समजण्यास मदत होते. यामुळे जास्त विचार करून मानसिक आरोग्य बिघडवू नका.
जास्त अपेक्षा करू नका
प्रत्येक व्यक्तीचे मत, विचार वेगवेगळे असतात. यामुळे तुम्ही प्रत्येकाला तुमच्या मताशी सहमत करून वाद कमी करू शकता अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. यासोबतच तुमचा मुद्दा मान्य होण्यासाठी अजिबात दबाव आणू नका. यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकते, ज्यामुळे तणाव वाढतो. प्रत्येकाची मते ऐकणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे.
स्व:ताच्या भावना समजून घ्या
जर तुम्हाला घरात एक क्षणही घालवणे कठीण होत असेल आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असेल, तेव्हा सर्व काही सोडा आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. तणाव वाढवणाऱ्या या गोष्टींपासून दूर राहावे. मनाला तणावमुक्त ठेवण्यासाठी ध्यान करावे. थोडा वेळ स्वत: सोबत घालवावा. या सर्व गोष्टींमुळे मानसिक आरोग्य निरोगी राहील.
योगा करावा
मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगा किंवा व्यायाम करणे फायदेशीर ठरते. यामुळे घरात किंवा नात्यात होणऱ्या वादाचा तुमच्या आरोग्यावर होणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.