Relationship: दोघेही वर्कींग आहात तर 'असे' साभांळा पर्सनल अन् प्रोफेशनल लाइफ

Relationship: जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. यामुळे त्याचे संसार सुखी राहते.
Relationship
RelationshipDainik Gomantak

relationship tips balance career personal life while both are working persons

आजकाल अनेक जोडपे नोकरी करतात. नोकरी करणाऱ्या जोडप्यांना पर्सनर आणि प्रोफेशनल जीवनात योग्य संतुलन ठेवणे गरजेचे असते. कारण कामाचे स्ट्रेस घरी आणल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकते. यामुळे जोडप्यांनी नात्यात गोडवा आणि प्रेम कायम राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

  • सर्व विषयांवर मनमोकळे बोलावे

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी किंवा करिअरशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असाल तर तुमच्या जोडीदाराशीही त्याबद्दल चर्चा करा. अनेक वेळा या निर्णयांचा तुमच्या जोडीदारावरही परिणाम होतो. जसे की, तुम्ही तुमची नोकरी सोडण्याचा किंवा बदलण्याचा विचार करत असाल तर एकत्र बसून त्याबद्दल विचार करा.

  • जोडीदारालाकडून जास्त अपेक्षा करू नका

जर तुम्ही दोघेही नोकरी करत असाल तर अशा अपेक्षा ठेवू नका ज्या पूर्ण होत नसेल. कारण यामुळे तुमचे मन दुखेल आणि चिडचिड होईल. ऑफिसमधल्या कामाचा ताण आणि घरी येताच जोडीदाराच्या तक्रारी यामुळे काही वेळा तणाव इतका वाढतो की तुमच्या नात्यात दुरावा येऊ लागतो. यामुळे विकेंडला दोघांनी एकत्र जेवायला जावे.

  • जबाबदाऱ्या वाटून घ्या

जर दोघंही नोकरी करत असाल तर नात्यात आनंद आणि शांती टिकवण्यासाठी घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजे. सकाळ-संध्याकाळची कामे, मुलांना शाळेत सोडणे, स्वयंपाक करणे इत्यादी जबाबदाऱ्या केवळ एका व्यक्तीच्या खांद्यावर असू नयेत. त्यामुळे नात्यात भांडणे होतच असतात.

  • एकमेकांना क्वॉलिटी टाइम द्या

दिवसभराच्या धावपळीनंतर ऑफिसला परतल्यावर थोडा वेळ शांत बसावे. एकत्र बसल्यावर कार्यालयीन विषय बाजूला ठेवा आणि असे विषय समोर आणा ज्यामध्ये दोन्ही लोक सहभागी होऊ शकतील. वीकेंडला बाहेर जा किंवा चित्रपट पहा, लंच किंवा डिनरचे प्लॅनिंग करा. यामुळे तणाव कमी होईल आणि नातं घट्ट देखील होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com