Relationship: कोणतंही नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असते. पण प्रेमाने पोट भरत नाही यात शंका नाही. पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी असते जी आपल्यावर खूप प्रेम करेल. प्रेमाशिवाय प्रत्येक सुख-सुविधा काही दिवसानंतर नकोशा होऊ लागतात. खरं तर, खरोखर प्रेमळ जोडीदार ही व्यक्तीसाठी सर्वात मोठी संपत्ती असते. पण अनेकवेळा खऱ्या प्रेमाच्या शोधात अशी काही माणसे भेटतात जी फक्त टाइमपाससाठी जवळीक वाढवतात आणि वाटेल तेव्हा सोडून जातात. तुम्हीही अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात का? हे कसे ओळखाल हे जाणून घेऊया.
मनमोकळेपणाने बोलणे
कोणत्याही नात्यात मनमोकळेपणाने बोलणे गरजेचं असतं. कारण बोलल्यामुळेच भावना, स्ट्रेस शेअर करता येतात. पण नात्यात मनमोकळेपणाने बोलणे होत नसेल तर दोघांमध्ये खरं प्रेम नाही.
भविष्याबद्दल बोलणे
जो व्यक्ती आपल्या रिलेशनला आणि पार्टनरला महत्त्व देतो त्याला भविष्याबद्दल बोलण्यात काहीच अडचण येत नाही. तो त्याचे सर्व प्लॅनिंग आपलं नातं डोळ्यासमोर ठेवून करतो. पण टाईमपास करण्यासाठी रिलेशनशिपमध्ये आलेली व्यक्ती भविष्याबद्दल बोलणे टाळते.अशा व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका.
एकमेकांना भावनिक आधार देणे
खऱ्या प्रेमाचे लक्षण म्हणजे एकमेकांना भावनिक आधार देणे होय. कधी कठीण प्रसंग आला तर आपण एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करतो. कठिण काळी एकमेकांना दोष देत बसू नका. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या नातेसंबंधात भावनिकदृष्ट्या वेगळे वाटत असेल तर ते टॉक्सिक रिलेशन असू शकते.
दोघांनीही नातं टिकवाव
जर तुमच्या जोडीदाराला बोलून नात्यातील प्रत्येक गोष्ट जबरदस्तीने पुर्ण करावी लागत असेल, तर त्याचे तुमच्यावर खरं प्रेम नाही हे स्पष्ट होते. हेल्दी रिलेशनशिपसाठी दोघांनीही प्रयत्न करावे.
एकमेकांप्रती निष्ठा
जर कपलमध्ये खरं प्रेम असेल तर ते एकमेकांचा विश्वासघात करण्याचा विचार कधीच करत नाहीत. जर तुमचा पार्टनर इतर मुलांसोबत किंवा मुलींसोबत फ्लर्ट करत असेल तर ते चांगले लक्षण नाही. यावरून असं म्हणता येईल की नात्यात प्रेमाचा अभाव आहे किंवा नातं म्हणजे फक्त टाईमपास आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.