तुम्हालाही 'Reel Addiction' असेल तर 'असे' मिळवा नियंत्रण

Reel Addiction: अनेक लोकांना सोशल मिडियावर रिल्स पाहण्याची सवय असते.
Reel Addiction'
Reel Addiction'Dainik Gomantak
Published on
Updated on

how to get rid social media reels

सोशल मीडियावर टाईमपास किंवा किती वेळ वाया जातो हे लोकांना कळत नाही. रील आणि शॉर्ट व्हिडिओ आल्यापासून लोकांना त्यांचे व्यसन लागले आहे. लोक दिवसभर मोबाइलवर रील्स पाहत बसतात आणि आपला वेळ वाया घालवतात. तुम्हाला माहिती आहे का की विज्ञानाने रीलच्या सवयीला रील अॅडिक्शन असे नाव दिले आहे.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार, रील्सचे कारण मास सायकोजेनिक आजार आहे. हा मास सायकोजेनिक आजार म्हणजे काय आहे ते जाणून घेऊया. यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात? रील्सची सवय कशी दूर करू शकतो हे जाणून घेऊया.

मास सायकोजेनिक आजार म्हणजे काय?

जे लोक त्यांचा मोबाइल खूप वापरतात आणि रील्स आणि व्हिडिओ पाहतात त्यांना मोठ्या प्रमाणात सायकोजेनिक आजार होऊ शकतो.

लक्षणे कोणती?

मास सायकोजेनिक आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशी व्यक्ती बोलत असताना पाय हलवते.

अतिप्रमाणात रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहत असेल तर त्याचा मेंदूवरही परिणाम होतो. एकाग्रता कमी होते आणि त्यांचे मन चंचल राहते.

स्क्रीनकडे टक लावून पाहिल्याने डोळ्यांवर विपरित परिणाम होतो. मोबाईलच्या प्रकाशाचा डोळ्यांच्या रेटिनावर परिणाम होतो.

मोबाईल स्क्रीन पाहण्यासाठी नेहमी मान झुकवून ठेवावी लागते, त्यामुळे मान वाकवून ठेवल्याने मान दुखू शकते.

रीलसह सोशल मीडियाचे व्यसन लागले तर इतरांचे अधिक फॉलोअर्स आणि त्याच्या पोस्टवर अधिक लाईक्स पाहून डिप्रेशनची समस्या वाढू शकते.

रील्सच्या अॅडिक्शनपासून कसे मुक्त व्हाल

मनोरंजनाचे माध्यम बदलावे

टाइमपाससाठी आणि मनोरंजनासाठी मोबाइलवर रिल्स पाहतात. पण हळुहळू हा टाईमपास टाईम वेस्ट बनत जातो. जर तुम्हाला रील्स पाहण्याचे व्यसन असेल तर मनोरंजनासाठी रील पाहण्याऐवजी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवावा. तुमच्या आवडीचे काम करावे. मैदानी खेळ खेळावे.

ॲप डिलीट करावे

अनेकांना खूप प्रयत्न करूनही फोन आणि रील्सचे व्यसन सोडता येत नाही. अशावेळी मोबाइलमधून अॅप डिलीट करावे.

टाइम सेट करावा

कोणतीही सवय लगेच सोडणे अवघड जाते. यामुळे व्यसन हळूहळू सोडायचे असेल तर माबाइल वापरतांना टाइम सेट करावा. मोबाइल सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही सोश मिडिया किती वेळ वापरू शकता हे तापासावे. हळूहळू वापर कमी करावा.

नोटिफिकेशन्स बंद करावे

मोबाइल नोटिफिकेशन्स लोकांना ॲप उघडण्यास भाग पाडतात. त्यानंतर लोक मोबाइलच्या स्क्रीनवर तासंतास स्क्रोल करत राहतात. तुम्ही येणारे नोटिफिकेशन्स बंद केले तर तुमचे मन विचलित होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com