Modak Kheer Recipe: गणपती बाप्पांना खीर मोदकाचा भोग

Ganesh Festival: यंदा गणेशोत्सवात मोदक खीर नक्की तयार करून पहा.
Modak Kheer Recipe
Modak Kheer RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये बाप्पांला मोदक खीर देखील अर्पण केली जाऊ शकते. गणेश चतुर्थीपासून सणासुदीला सुरुवात होते. यंदा 31 ऑगस्टला गणेश चतुर्थीसोबतच 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशाला हिंदू धर्मातील पहिले देवता मानले जाते. या 10 दिवसांमध्ये गणपतीला (Ganpati Festival) प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ अर्पण केले जाते. जर तुम्हाला 10 दिवसात गणपतीला वेगवेगळे भोग अर्पण करायचे असतील तर तुम्ही कोणत्याही एका दिवशी मोदक खीर देखील देऊ शकता. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे.

मोदक खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दूध– 1.5 लिटर

फ्रेश क्रीम – 1/2 कप

तांदळाचे पीठ – 1 कप

साखर पावडर – 2 चमचे

पिस्ता – 2 चमचे

वेलची पावडर – 1/2 टीस्पून

किसलेले खोबरे – २ मोठे चमचे

केशर – एक चिमूट

देशी तूप – 1 चमचा

साखर - 1/2 कप

मीठ - चिमूटभर

* मोदक खीर बनवण्याची पद्धत

मोदक खीर बनवण्यासाठी प्रथम तांदळाचे पीठ मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यावे. यानंतर पिठात चिमूटभर मीठ आणि देशी तूप घाला. आता हळूहळू एक कप पाणी घाला आणि ढवळत असताना मिक्स करा जेणेकरून पिठात गुठळ्या राहणार नाहीत. यानंतर पिठात साखरपूड आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. यानंतर त्यात उकळलेले पाणी घालून चवीला गोड लागेल असे पीठ मळून घ्या. यानंतर पीठ थोडा वेळ बाजूला ठेवा. पीठाचे तापमान सामान्य झाल्यावर तळहातावर तूप लावून कणकेचे छोटे गोळे तयार करा. एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा. पिठाचे सर्व गोळे तयार झाल्यावर स्टीमर घेऊन त्यात गोळे टाकून 8-10 मिनिटे वाफवून शिजवा. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही यासाठी कुकर देखील वापरू शकता.

Modak Kheer Recipe
HydraFacial बनवेल आपल्या त्वचेला सेलिब्रिटींप्रमाणे उजळ

आता एका भांड्यात दूध काढून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूध गरम असताना सतत ढवळत राहा. दूध घट्ट झाल्यावर गॅसची आंच कमी करून त्यात अर्धी वाटी साखर, वेलची पूड, मलई आणि केशर घालून मिक्स करा. यानंतर वाफवलेले गोळे दुधात टाकून झाकण ठेवून शिजू द्या. 5-7 मिनिटांत कणकेचे गोळे मऊ होतील आणि खीर मलईदार होईल. त्यानंतर गॅस बंद करा. मोदक खीर गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी तयार आहे. अर्पण करण्यापूर्वी त्यावर पिस्त्याने सजवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com