Home Decoration Idea: यंदा रक्षाबंधन बनवा खास, घराची अशी करा सजावट

रक्षाबंधननिमित्त तुम्हाला जर घर सजवायचे असेल तर या सोप्या टिप्सचा वापर करू शकता.
Home Decoration Idea| Rakshabandhan
Home Decoration Idea| RakshabandhanDainik Gomantak

 Home Decoration Idea For Raksha Bandhan: रक्षाबंधन हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण भावा-बहिणीसाठी महत्वाचा असतो. या खास दिवशी तुम्हाला जर घर सजवायचे असेल तर काही सोप्या टिपस सांगणार आहोत. यामुळे घराला नवा लुक मिळेल.

  • फुलांची सजावट

यंदा रक्षाबंधनाला तुम्ही सुंदर फुलांची सजावट करून साजरी करू शकता. तुम्ही राखीचे ताट चाफा किंवा गुलाबाच्या पुलांनी सजवू शकता. तसेच जेवतांना ताटा भोवती फुलांची रांगोळी काढू शकता. फुलांमुळे घराला सुगंध तर येईलच पण घर देखील आकर्षित दिसेल.

  • सुंदर कार्पेट

डायनिंग रूम सजवण्यासाठी तुम्ही कार्पेटचा वापर करू शकता. तुमच्या भिंतींच्या रंगाशी जुळणारे कार्पेट टाकू शकता. यामुळे त्या रूमची शोभा वाढते. घरातील एक छोटा बदल देखील घराला आकर्षक बनवतो.

  • लाइटिंगचा वापर

फुलांशिवाय तुम्ही रंगीत लाइट्सचा वापर करू शकता. आजकाल मार्केटमध्ये कलरफुल लाइट्स उपल्बध आहेत. तुम्ही भितींवर सुंदर लाइट्सची सजावट करू शकता.

Home Decoration Idea| Rakshabandhan
Gardening Tips: जास्वंदाचे रोप लावताना 'या' सोप्या टिप्सचा करा वापर
  • छोटे इनडोअर प्लांट

इनडोअर प्लांटस ठेऊन लिव्हिंग रूमची सजावट करू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे.

  • सेल्फी पॉइंट

रक्षाबंधनाला भावासोबत फोटो काढण्यासाठी तुम्ही सेल्फी पॉइंट बनवु शकता. यासाठी बाल्कनीत काही झाडे ठेवू शकता.

  • पामच्या झाडाने सजावट

तुम्ही घरता अरेका पाम सुंदर भांड्यात लावू शकता. यामुळे घराची शोभा वाढेल. तसेच घराला एक नवा लूक मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com