Gardening Tips: जास्वंदाचे रोप लावताना 'या' सोप्या टिप्सचा करा वापर

तुम्हाला जर जास्वंदाचे झाड लावायचे असेल तर या टिप्स फॉलो करा.
Gardening Tips:
Gardening Tips: Dainik Gomantak
Published on
Updated on

Gardening Tips: जास्वंदाच्या रोपाचे आरोग्य आणि त्वचेसाठी खुप फायदेशीर असते. तसेच घरात जास्वंदाचे रोप असणे चांगले असते. गणपती बाप्पाला देखील लाल जास्वंदाचे फुल प्रिय आहे. तुम्हाला जर जास्वंदाचे रोप घरात लावायचे असेल तर या टिप्स फॉलो करा. यामुळे झाडाला अनेक फुल येतील.

  • जास्वंदाची कलम

जास्वंदाच्या रोपाची लागवड करण्यासाठी पहिले जास्वंद रोपाची सुमारे 6 इंच लांब कलम घ्यावी. नंतर या कलममधून पाने काढा आणि एका डब्यात पाणी भरा. नंतर कलमचा अर्धा भाग पाण्यात बुडवून हलका सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवा. तीन ते चार आठवड्यांच्या आत, जास्वंदच्या कलममध्ये मूळ येतील.यानंतर ही कलम कुंडीमध्ये किंवा गार्डनमध्ये मोकळ्या जागेत लावू शकता.

  • कुडींमध्ये लावतांना घ्यावी काळजी

जास्वंदाची लागवड करण्यासाठी प्रथम कुंडीत माती भरून ते तयार करा. नंतर जास्वंदचे सुमारे 6 इंच लांब कलम घ्या आणि ते अर्ध्यापर्यंत जमिनीत लावावे. यानंतर, माती चांगली व्यवस्थित करा आणि थोडे पाणी शिंपडा. काही दिवसांतच कलममध्ये नवीन पाने येण्यास सुरुवात होईल.

  • बियांपासून जास्वंदाचे रोपे

जास्वंदच्या बियापासून तुम्ही घरी नवीन रोप देखील वाढवू शकता. यासाठी वाळलेल्या पिशव्या किंवा लहान भांडे घ्या. नंतर ते कंपोस्ट केलेल्या मातीने भरा आणि त्यावर जास्वंदच्या बिया ठेवा. यानंतर जमिनीत थोडं पाणी शिंपडून त्याची रोज काळजी घ्यावी. दररोज जमिनीत तेवढेच पाणी फवारावे जेणेकरून माती ओलसर राहील पण जास्त पाणी घालू नये. काही दिवसात नवीन रोपे वाढू लागतील.

  • या गोष्टी ठेवा लक्षात

जास्वंदाचे रोपे पावसाळ्यातही लावता येते. परंतु जास्वंदाचे रोप लावण्यासाठी योग्य वेळ मार्च ते ऑक्टोबर दरम्यान मानले जाते. म्हणूनच यावेळी लागवड करणे चांगले असते. जास्वंदाचे रोप लावण्यासाठी, हे देखील लक्षात ठेवा की मातीमध्ये थोडी वाळू मिक्स केली पाहिजे. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. तसेच झाडाची वाढ देखील चांगली होते.

  • जास्वंदाच्या रोपाची अशी काळजी घ्यावी

काही गोष्टींची काळजी घेतल्यास जास्ंवदाची चांगली वाढ होते. हो रोप निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून काही तास सूर्यप्रकाशात ठेवा. यासोबतच झाडाला वेळोवेळी खत घालावे. यामुळे रोपाची वाढ चांगली होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com