Vastu Tips: 'या' 5 देवतांना राखी बांधल्याने आर्थिक संकट होईल दूर

रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या देवतांना राखी बांधल्यास आर्थिक संकट दूर होईल हे जाणून घेऊया.
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips: रक्षाबंधन हा सण भावाबहिणीचा सण म्हणून ओळखला जातो. यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भावाला राखी बांधण्यापुर्वी या 5 देवतांना राखी बांधावी. असे कल्याने तुमचे जीवन सुरक्षित आणि आनंदी राहिल. रक्षाबंधनाला कोणत्या देवतांना राखी बांधावी हे जाणून घेऊया.

 lord shiva
lord shivaDainik Gomantak
  • भगवान शंकर

महादेवाला रक्षाबंधनाला राखी बांधावी. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय आहे. या दिवशी भगवान शंकराला राखी बांधल्याने भगवान शिव सर्व मनोकामना पूर्ण करतात.

Hanuman
Hanuman Dainik Gomantak
  • भगवान हनुमान

हनुमानजी हे शिवजींचे रुद्रावतार आहेत. हनुमानजींना राखी बांधल्याने कुंडलीतून मंगल दोष दूर होतो. यासोबतच हनुमानजींच्या कृपेने तुम्हाला शक्ती आणि बुद्धी प्राप्त होते.

Ganpati Bappa morya
Ganpati Bappa moryaDainik Gomantak
  • गणपती बाप्पा

शिवपुत्र गणेशाला राखी बांधणे देखील शुभ मानले जाते. गणपती बाप्पाला आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि संकटे दूर करण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी गणेशजींना राखी बांधावी.

Krishna
KrishnaDainik Gomantak
  • श्रीकृष्ण

तुम्ही भगवान कृष्णाला राखी बांधू शकता. श्रीकृष्णाला राखी बांधल्याने तो नेहमी तुमचे रक्षण करेल. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला राखी बांधणे शुभ मानले जाते.

Nagdevta
NagdevtaDainik Gomantak

रक्षाबंधनाला नागदेवतेला राखी बांधल्याने काल सर्प दोषाच्या भयापासून मुक्ती मिळते. नागदेवतेला राखी बांधल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात अशी धार्मिक मान्याता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com