Pumpkin Flower: 'हे' फूल अनेक आजारांवर ठरु शकते रामबाण उपाय, जाणून घ्या खाण्याचे 5 फायदे

भोपळा खाण्याचे फायदे तुम्हाला सर्वांना माहित असतीलच, पण आज आम्ही तुम्हाला भोपळ्याचे फुल खाण्याचे चमत्कारी आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
Pumpkin Flower
Pumpkin FlowerDainik Gomantak
Published on
Updated on

Pumpkin Flower: भोपळा एक सुपरफूड फळभाजी म्हणून ओळखला जातो. ज्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की भोपळ्यासोबतच त्याची पिवळी आणि सुंदर फुले देखील औषधीयुक्त गुणांचा खजिना आहे.

या फुलाचा वापर खाण्यासाठी केला जातो. या फुलांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्त्वे, खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. हे फूल आपल्याला अनेक रोगांशी लढण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया भोपळ्याची फुले खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे होतात.

  • भोपळ्याची फुले खाण्याचे फायदे

 भोपळ्याच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला यासारख्या समस्यांपासून आपण दूर राहतो.  शरीरात लोहाचे शोषण करते, ज्यामुळे शरीर कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून दुर राहते.

  • इन्फेक्शनची समस्या दुर

भोपळ्याच्या फुलांचे सेवन केल्याने शरीरातील बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनची समस्या दूर होते. बहुतेकदा उन्हाळ्यात इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. भोपळ्याच्या फुलांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. भोपळ्याचे फूल तुम्हाला कोणत्याही आजारातून बरे होण्यासाठी खूप मदत करू शकते.

  • पचनसंस्थेसाठी फायदेशीर

भोपळ्याच्या फुलांचे सेवन केल्याने पचनसंस्थेलाही फायदा होतो. पचनसंस्था सुरळित कार्य करते. कारण त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते. याचे सेवन केल्याने पोटात जडपणा, अपचन गॅस सारख्या समस्या दूर होतात.

Pumpkin Flower
International No Diet Day: डाएटिंग केल्याने होउ शकतात 'हे' आजार
Pumpkin Flower:
Pumpkin Flower: Dainik Gomantak
  • डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते

भोपळ्याच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असते. जे दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर मानले जाते. कोरड्या डोळ्यांच्या समस्येवरही हे खाणे फायदेशीर आहे. भोपळ्याची फुले नियमित खाणे देखील रातांधळेपणा सारख्या समस्यांमध्ये फायदेशीर आहे.

  • हाडांसाठी फायदेशीर

भोपळ्याच्या फुलाचा हाडांना फायदा होतो. कारण त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिसच्या आजारातही हे फायदेशीर आहे. याशिवाय दात मजबूत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com