Protein Rich Fruit
Protein Rich FruitDainik Gomantak

Protein Rich Fruit: प्रोटीनची कमतरता भरुन काढण्यासाठी शाहाकारी लोकांसाठी 'ही' फळे येतील उपयोगी

Protein Rich Fruit: ते मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळे पर्याय शोधावे लागतात.
Published on

Protein Rich Fruit: प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार स्वत:चा आहार ठरवत असतो. यातील काहीजण शाहाकारी असतात तर काहीजण मासांहरी असतात. आता मासांहरी लोक शाहाकारदेखील करत असल्याने त्यांना सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात. मात्र शाहाकारी लोकांना मासांहरातून जे पोषक घटक मिळतात ते मिळू शकत नाहीत. ते मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळे पर्याय शोधावे लागतात.

जे शाहाकार करतात त्यांना अनेकदा प्रोटीनची कमतरता जाणवते. आपल्या मांसपेशींना मजबूत करण्यासाठी प्रोटीन सगळ्यात महत्वाचा पोषक घटक मानला जातो. यामुळे आपले शरिर मजबूत होते.

चला तर जाणून घेऊयात, प्रोटीन मिळवण्यासाठी मासांहराला कोणते पर्याय असू शकतात. अशी काही फळे जी आपल्याला सहजपणे उपलब्धदेखील होऊ शकतात आणि रोज त्याचा आपण आपल्या आहारात समावेशदेखील करु शकतो.

१. पेरु

पेरू हे एक अतिशय चविष्ट फळ आहे जे थेट खाता येते. याशिवाय पेरु सॅलडच्या स्वरूपात खाता येतो. पेरुचा रस आणि जेली देखील तयार केली जाते. त्यात लाल आणि पांढरा भाग आहे, जो फायबरचा समृद्ध स्रोत आहे. जर तुम्ही 100 ग्रॅम पेरू खाल्ला तर तुम्हाला सुमारे 2.6 ग्रॅम प्रोटीन मिळेल. त्यामुळे पेरु प्रोटीनचा महत्वाचा स्रोत मानला जातो.

२. खजूर

शतकानुशतके मध्य पूर्व देशांमध्ये खजूर हे मुख्य फळ म्हणून खाल्ले जात आहे. ते भारतातही घेतले जाते. खजूर तुम्ही अनेकप्रकारे खाऊ शकता. युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, 100 ग्रॅम खजूरमध्ये 2.45 ग्रॅम प्रथिने आणि 8 ग्रॅम फायबर असतात.

Protein Rich Fruit
Happy Life Tips: मनातील भावना सहज कशा व्यक्त कराल, काही सोप्या अन् उपयुक्त टिप्स

३. बेदाणे

मनुका अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये वापरला जातो. ते द्राक्षे सुकवून तयार केले जाते, युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागानुसार, प्रत्येक 100 ग्रॅम मनुकामध्ये सुमारे 3 ग्रॅम प्रथिने असतात.

याबरोबरच, अॅव्हाकॅडो, अॅप्रीकोट, किवी, फणस ही फळेदेखील प्रोटीनचा समृद्ध स्रोत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com