
ऑफिसमध्ये काम करणारे लोक त्यांच्या डेस्कवर बसून स्क्रीन पाहण्यात बराच वेळ घालवतात. कधीकधी त्यांना एकाच स्थितीत बसून तासन्तास काम करावे लागते. अशा जीवनशैलीमुळे आजारांचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. ही सवय त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते. अशा परिस्थितीत, स्वतःला निरोगी ठेवणे खूप महत्वाचे असते, जेणेकरुन तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराला बळी पडू नये. यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही निरोगी सवयी अंगीकारु शकता. या सवयी तुमचे लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत करु शकतात.
डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. म्हणून, वजन कमी करताना स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी, तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवा आणि वेळोवेळी पाणी (Water) पीत राहा. तसेच, हर्बल टी आणि संत्री किंवा काकडीसारखी फळे खा. मात्र कॅफिन टाळा, कारण त्यामुळे डिहायड्रेशन वाढू शकते. तुमची ऊर्जा देखील कमी होऊ शकते.
ऑफिसमध्ये (Office) जास्त वेळ काम केल्याने लोक दिवसभर स्क्रीनकडे पाहत राहतात, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोकेदुखी वाढते. यासाठी तुम्ही 20-20-20 नियमाचे पालन केले पाहिजे, म्हणजेच 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंदांसाठी पाहा. ताण टाळण्यासाठी, वारंवार डोळे मिचकावा आणि मध्येमध्ये ब्रेक घ्या.
काम करताना चिप्स आणि कुकीज खाणे टाळा. त्याऐवजी, काजू, फळे, दही, भाजलेले चणे किंवा ग्रॅनोला बार सारखे पौष्टिक आणि हेल्दी स्नॅक्स खा. हा हेल्दी स्नॅक्स केवळ तुमची उर्जा पातळीच वाढवतात असे नाही तर साखर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतात. याशिवाय, ते तुमची तल्लफ देखील कमी करतात, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.