Prajakta Mali Beauty Tips : सुंदर आणि नितळ त्वचा कुणाला नको असते? प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते की आपली त्वचा चित्रपट किंवा टिव्हीमधील अभिनेत्रींप्रमाणे नितळ आणि सुंदर असावी. त्यासाठी स्त्रिया सतत काही ना काही नवनवीन प्रयोग करत असतात. पण चेहऱ्याला महागडी उत्पादने लावण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले चांगले.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सुंदर त्वचेसाठी काही सोप्या टिप्स सांगते. तिच्या म्हणण्यानुसार, आपल्याला चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील, चेहऱ्यावर डाग पडत असतील किंवा त्वचा खूप कोरडी होत असेल तर त्यामागची कारणे शोधून त्यानुसार घरगुती उपचार करायला हवेत. चेहऱ्याला महागडी ब्रँडेड उत्पादने लावून काही उपयोग होत नाही. तिने सांगितलेल्या सोप्या टिप्स काय ते जाणून घेऊयात.
(Prajakta Mali Beauty Tips)
1. नेहमी तोंड धुणे :
प्राजक्ता सांगते की, दिवसातून किमान पाच वेळा गार पाण्याने तोंड धुणे गरजेचे आहे. हे करताना तोंडाचा फुगा करावा. हे करण्याने आपल्या त्वचेच्या थरात जी घाण बसलेली असते ती निघून जाण्यास मदत होते.म्हणून आपला चेहरा स्वच्छ साध्या पाण्याने धुणे ही अतिशय महत्त्वाची आणि बेसिक गोष्ट आहे.
2. आपल्या त्वचेला काय सूट होते हे ओळखा :
आपल्या चेहऱ्यावर कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याआधी आपल्या त्वचेचा प्रकार समजून घ्यावा. आपल्या चेहऱ्याला काय सूट होते ते पहावे. प्रत्येकाची स्किन वेगळी असते, आपल्या त्वचेला काय सूट होईल याचा अभ्यास करा आणि त्यानुसार उत्पादने वापरा.
3. संतुलित आहार घ्या :
त्वचेची जशी बाहेरून काळजी घेणे गरजेचे आहे तसेच आतून काळजी घेणेही तितकेच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचे आहे. आपण जे खातो तसेच आपण बनत असतो. त्यामुळे त्वचा जर निरोगी आणि सुंदर असावी असे वाटत असेल तर त्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. तेलकट आणि अति मसाल्याचे पदार्थ खाणे टाळा.
4. झोपताना या गोष्टी लक्षात ठेवा :
ब्यूटी प्रॉडक्टसबद्दल सर्वच स्त्रियांना भलतेच आकर्षण असते. आपण अनेकवेळा आपल्या चेहऱ्याला खूप महागडे ब्यूटी प्रॉडक्टस लावायला जातो. पण त्याला आपल्या चेहऱ्यावर फारसा काही उपयोग होत नाही. रात्री आपला चेहरा तसाच न ठेवता चेहऱ्याला नाईट क्रीम किंवा खोबरेल तेल लाऊन झोपावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.