Cold Water: उन्हाळा जाणवू लागला की आपल्याला थंडगार पाणी आठवते. अनेकवेळा आपण फ्रीजमधील पाण्याला प्राधान्य देतो. पण हे फ्रीजमधील पाणी आपल्या आरोग्याला हानी पोहचवू शकते.
फ्रीजमधील पाण्याला काय पर्याय असू शकतो? या प्रश्नाला उत्तर म्हणून आपण माठातील पाणी पिण्यासाठी वापरु शकतो. माठातील पाणी पिण्याचे काही फायदे आहेत. हे फायदे आणि कसे मिळू शकतात हे आज आपण जाणून घेऊयात.
माठातील पाणी शरीरासाठी का उपयोगी असते
अनादी काळापासून मनुष्य मातीची भांडी वापरत आला आहे. मातीच्या भांड्यामध्ये नैसर्गिकपणे काही महत्वाचे गुणधर्म असतात. या मातीच्या भांड्यांना लहान छिद्र असते. माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते.
परिणामी मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.
मातीच्या माठातले पाणी पिल्याने मेटॅबॉलीझम वाढते. उष्माघातापासून संरक्षण मिळते. फ्रीजमधील पाणी घशाला अपाय पोहचवू शकते. मात्र माठातील पाणी घशासाठी फायदेशीर मानले जाते. आता बाजारात अनेक प्रकारचे माठ उपलब्ध होत असतात. यामधील हाताने बनवलेले माठ आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.