POP Design Ideas
POP Design IdeasDainik Gomantak

POP Design Ideas: 'घरात पीओपी करताय? मग 'या' डिझाइन्स नक्की ट्राय करा

तुम्हीह घरात पीओपी करण्याचा विचार करत असाल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
Published on

POP Design Ideas: पीओपी या शब्दाचा पूर्ण अर्थ प्लास्टर ऑफ पॅरिस असा आहे. हे डिझाइन घराच्या छतावर केले जाते. सामान्य छतापेक्षा पॉप सीलिंगला जास्त पसंती दिली जाते. लिव्हिंग रूम असो, बेडरूम किंवा डायनिंग रूम, घराचा कोणताही भाग असो, त्याचे डिझाईन्स खूप सुंदर दिसतात. यामुळे घराला आकर्षक लूक मिळतो.

3D पीओपी डिझाइन

अशा पीओपी डिझाईन बेडरूमसाठी छान दिसतात. यामध्ये तुम्हाला डायमंड, फ्लोरल आणि स्टार शेपच्या डिझाईन्सही देखील मिळतील. रूमचे सौंदर्य वाढवण्यासाठी हे सर्वोत्तम मानले जातात. परंतु इतरांच्या तुलनेत ते थोडे महाग आहेत. 3D पीओपी डिझाईन्स लाइटिंगशिवाय सुंदर दिसत नाहीत.

बॉक्सशेप पीओपी डिझाइन

यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मिळतील. हे लहान बॉक्स आणि मोठे बॉक्स पीओपी डिझाइन घरासाठी सर्वोत्तम मानले जातात. तुम्ही तुमच्या घराच्या हॉल आणि बेडरूममध्ये अशी डिझाईन्स करून घेऊ शकता.

राऊडं शेप डिझाइन

अशा डिझाईन्समुळे तुमचे घर एखाद्या रॉयलसारखे दिसेल. जर तुम्ही तुमच्या घरात डिझाइन केलीत, तर लोकांचे लक्ष वेधून घेईल. पीओपी फॉल्स सीलिंगसह तुमचे घर अदिक सुंदर दिसेल.

लिव्हिंग रूमसाठी डिजाइन

जर तुम्हाला तुमच्या रूमला वॉर्म लूक द्यायचा असेल तर तुम्ही फॉल्स सीलिंगमध्ये एलईडी लाइट्स लावू शकता. जर तुमच्याकडे फॉल्स सिलिंग बनवण्यासारखे बजेट नसेल तर तुम्ही लिव्हिंग रूमसाठी एक साधी पीओपी डिझाइन सिलेक्ट करू शकता. हे डिझाईन्स स्वस्त आणि मस्त असतात. यामुळे रूम छान दिसतात.

तुम्ही साधे कमी किमतीचे पीओपी डिझाइन शोधत असाल, तर तुमच्या छतासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बीनेशन तुम्ही तुमच्या घराच्या छतासाची सजावट करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com