Plastic Toys Reuse Tips: लहान मुलांच्या जुन्या खेळण्याचा घरगुती कामांसाठी 'असा' करा वापर

तुम्ही जर लहान मुलांची जुने खेळणे फेकुन देत असाल तर थांबा , कारण तुम्ही त्याचा घरगुती कामांसाठी वापर करू शकता.
Plastic Toys Reuse Tips
Plastic Toys Reuse TipsDainik Gomantak

Plastic Toys Reuse Tips: घरात असलेली कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. जरी वस्तूंचे नुकसान झाले असले तरी तुम्ही त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा वापर करू शकता.  लहान मुलांची अनेक खेळणी  काही काळानंतर खराब होतात आणि आपण फेकुन देण्याचा विचार करतो, पण असे करू नका. कारण याचा तुम्ही घरातील विविध कामांसाठी करू शकता.  

  • बास्केट

जुन्या खेळण्यांच्या मदतीने तुम्ही बास्केट बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त प्राण्यांचे वेगवेगळे तुटलेले भाग जोडून त्यांना टोपलीचा आकार द्यायचा आहे. तुम्ही कार्डबोर्डची टोपली बनवू शकता आणि त्यावर खेळणी चिकटवू शकता. त्याचा वापर तुम्ही विविध वस्तु ठेवण्यासाठी करू शकता.

  • या ट्रिकचा करा वापर

समजा तुमच्या मुलांकडे सेलवर चालणारी कार आहे. पण ते खराब झाल्यावर तुम्ही दोरीच्या साहाय्याने कारसोबत पुन्हा खेळू शकता. यामुळे तुमची जुनी खेळणीही वापरात आणली जाईल. 

Plastic Toys Reuse Tips
Vastu Tips: घरात 'या' 5 ठिकाणी क्रिस्टल पिरॅमिड ठेवल्यास मिळेल आर्थिक लाभ
  • फोन स्टँड

तुम्ही जुन्या खेळण्यांच्या मदतीने फोन स्टँड देखील बनवू शकता. असे केल्याने काही पाहताना तुमचा फोन पडणार नाही आणि तुम्ही हात न वापरता फोनवर काहीही सहज पाहू शकाल. तसेच दिसायला देखील हटके असेल.  

  • बुक होल्डर म्हणून वापरा

वरील सर्व ट्रिक्ससोबतच तुम्ही जुनी खेळणी बुक होल्डर म्हणून देखील वापरू शकता. यामुळे तुम्हीही जुने खेळणे फेकुन देण्याचा विचार करत असाल वरील ट्रिक नक्की ट्राय करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com