श्रावणात 'ही' 5 झाडे घरात लावल्यावर महादेव होतील प्रसन्न

Shravan Month: जाणून घउया महादेवाला कोणती झाडे प्रिय आहेत.
Shravan Month
Shravan MonthDainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळ्याची सुरुवात श्रावण पासून होते. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आणि सौभाग्यासाठी श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. यामुळे शिवपूजेसोबतच या महिन्यात भगवान भोलेनाथांच्या आवडत्या झाडांची योग्य दिशेने लागवड केल्यास फायदा होउ शकतो. चला जाणून घेऊया महादेवाला प्रसन्न करण्यासाठी घरात कोणती झाडे लावावीत. (planting 5 trees love lord shiva in shrawan favorable)

धोतरा:

धर्मग्रंथानुसार धोतऱ्यामध्ये भगवान शिव वास करतात. त्याची निळी फुले भोलेभंडारीला प्रिय आहेत. घरामध्ये काळ्या धोतर्‍याचे रोप लावणे शुभ मानले जाते. श्रावणातील कोणत्याही मंगळवारी किंवा रविवारी हे झाड लावल्यास शुभ मानले जाते. धोतरा रोप लावल्याने नकारात्मक शक्ती दुर होते. असे मानले जाते की धोतर्‍याचे मूळ घरामध्ये ठेवल्याने धनात वाढ होते.

शमी:

शमीचे झाड घरात लावने खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की शमीची पत्रे भगवान भोलेनाथला अर्पण केल्याने घरात सुख आणि सौभाग्य वाढते. शमी झाडाची नियमित पूजा केल्याने शनिदोषही दूर होतो.

Shravan Month
Banarsi Dum Aloo Recipe बनारसी दम आलूची चव जरूर चाखुन पहा

चंपा:

श्रावणमध्ये (shrawan) घरामध्ये चंपाचे झाड लावल्याने भाग्य लाभते. वास्तूनुसार चंपा झाडाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये उत्तर-पश्चिम दिशेला लावावे.

बेल पत्र:

घरामध्ये (Home) बेलाचे झाड लावल्यास महादेवासोबत देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पुराणानुसार ज्या ठिकाणी बेळपत्राचे रोप लावले जाते ते स्थान काशीसारखे पवित्र मानले जाते.

केळी:

गुरुवारी केळीचे झाड (Tree) लावणे श्रावणात शुभ मानले जाते. केळीचे झाड घरासमोर लावू नये तर मागे लावने योग्य असते. जागेअभावी घरात लावता येत नसेल तर आजूबाजूला जरूर लावा. केळीच्या झाडाला रोज पाणी टाकल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com