Places To Visit Near Redi: महाराष्ट्र-गोवा सीमेवरील प्रसिद्ध रेडीचा द्विभुज गणपती अन् प्रसिद्ध बीच

Places To Visit Near Redi: तुम्हीही रेडी द्विभुज गणपती मंदिराला भेट देणार असाल तर गोव्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता.
Places To Visit Near Redi
Places To Visit Near RediDainik Gomantak
Published on
Updated on

Places To Visit Near Redi Vengurla goa vagator baga kerim arambol beach

देशभरात संकष्टी चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संकष्टी चतुर्थीनिमित्त लोक गणपतीच्या मंदिरात जातात. गणपतीला आवडणारे लाल फुल आणि दुर्वा अर्पण करतात. असे मानतात की गणपती बाप्पाची मनभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात. तुम्ही संकष्टी चतुर्थीनिमित्त महाराष्ट्र-गोवा सीमेवर वसलेल्या प्रसिद्ध रेडी द्विभुज गणपती मंदिराला भेट देऊ शकता.

या मंदिरातील भव्य,आकर्षक आणि प्रसन्न मुर्ती भक्तांना भारवून टाकते. कारण गणपतीची मुर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मुर्तीचा एक हात आशीर्वाद देत आहे तर दुसरा हातात मोदक आहे. गणपतीच्या समोर एक मोठा उंदीर देखील आहे.

तुम्हीही रेडीचा द्विभुज गणपती मंदिराला भेट देणार असाल तर गोव्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता.

वागातोर बीच (Vagator Beach)

वागातोर बीच हा गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांपैकी एक सुंदर बीच आहे. रेडी गणपती मंदिरापासून अंतर 13.58 किमी आहे. जर तुम्ही रेडी गणपती मंदिरात गेलात तर गोव्यातील या निसर्गरम्य दृश्य पाहण्याचा आणि तेथे फोटो काढण्याची संधी गमवू नका.

बागा बीच (Baga Beach)

बागा बीच या मंदिरापासून 19.23 किमी अंतरावर आहे. तुम्ही बागा बीचवर नयनरम्य दृष्यांचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही जलक्रीडा पॅरासेलिंग, जेट-स्कीइंग, केळी बोट राइडचा आनंद लुटू शकता. तसेच या ठिकाणी स्वादिष्ट गोवन सीफुड आणि पेयांचा आस्वाद घेऊ शकता. या बीचवर शॉपिंग देखील करू शकता. तसेच या बीचवर पारंपारिक मासेमारी नोका देखील पाहायला मिळतात. यामुळे पर्यटकांचे आकर्षण वेढले जाते.

हरमल बीच (Arambol Beach)

हरमल बीच हे गोव्यातील एक निसर्ग सौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा आहे. हे बीच या मंदिरापासून 3.92 किमी अंतरावर आहे. येते तुम्ही जलक्रीडाचा आनंद लूटू शकता. विदेशातील पर्यटक येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. गोवा हे सीफूड प्रेमींसाठी नंदनवन आहे असे मानले जाते. या बीचवर तुम्ही फ्रेश सीफुडचा आस्वाद घेऊ शकता.

केरी बीच (Kerim Beach)

गोव्यातील केरी बीचवर नयनरम्य निसर्गाचा आनंद घेऊ शकता. या बीचवर मावळत्या सुर्याचे विलक्षण क्षण पाहू शकता आणि कॅमेरात कैद करू शकता. तुम्ही येथे जलक्रीडाचा आनंद लूटू शकता. या बीचवर फ्रेश गोवन सीफुडची चव चाखू शकता. रेडी मंदिरापासून 1.08 किमी अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com