Pitru Paksha अमावस्येला करा उडीद डाळीचे वडे, पितर होतील प्रसन्न

घरामध्ये श्राद्ध असेल किंवा पितृपक्ष अमावसेला आवडीचे पदार्थ खायला देऊन त्यांना प्रसन्न करायचे असेल तर त्या दिवशी उडीदाचे दही वडे बनवावे.
Urad Dal Dahi Vada Making Tips
Urad Dal Dahi Vada Making TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Urad Dal Dahi Vada Making Tips: पितृ पक्ष अमावस्येदरम्यान, 15 दिवस पितरांना भोजन दिले जाते. पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. विशेषतः उडीद डाळीपासून बनवलेल्या वस्तूंना या अमावस्ये दरम्यान खूप महत्त्व असते. अशा वेळी घरामध्ये श्राद्ध असेल किंवा पितृपक्ष अमावसेला आवडीचे पदार्थ खायला देऊन त्यांना प्रसन्न करायचे असेल तर त्या दिवशी उडीदाचे दही वडे बनवावे. ते खायला खूप चवदार लागतात.

Urad Dal Dahi Vada Making Tips
World Ozone Day: जागतिक ओझोन दिन का केला जातो साजरा , वाचा एका क्लिकवर

मात्र, दही बनवणे सोपे नाही आणि लोक अनेकदा तक्रार करतात की त्यांचे दही मऊ होत नाही. किंवा बाजारातील चविष्ट नसते अशी तक्रार करतात. आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट आणि मऊ दही वडा बनवायला सांगत आहोत. या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही दही वडे केले तर ते खूप मऊ होईल.

Urad Dal Dahi Vada Making Tips
Cause of Depression| सावधान! या व्हीटॅमिनच्या कमतरतेमुळे येवू शकते नैराश्य

Soft Dahi Vada Making Tips

  • उडीद डाळ किमान 6-7 तास आधी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. दाळ भीजत घालतांना त्यात मिठ घालू नये.

  • उडीद डाळीची पेस्ट करून घेतल्यानंतर त्या मिश्रणाला चमच्याने चांगले फेटणे गरजेचे आहे. कारण डाळ जितकी फेटाल तितके दही वडे मऊ होईल.

  • डाळ चांगली फेटल्यावर पाण्यात टाकून तपासा. जर डाळ पाण्यावर तरंगली तर ती चांगली फेटली गेली असे समजावे. आता त्यात मीठ, थोडे जिरे आणि लाल मिरची घाला.

  • वडे तळतांना मिडियम फ्लेमवर तळा. आणि गॅस मंद करा.

  • वडे हलके तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर वडे पाण्यात टाका. त्यामुळे अतिरिक्त तेल बाहेर पडेल आणि ते खूप मऊ होईल.

  • वडे पाण्यात 1 तास भिजत ठेवा. वडे सर्व्ह करताना पाण्यातून काढून त्यावर आंबट गोड आणि हिरव्या चटणीने गार्नीश करून सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com