Pineapple Juice Cough Remedies: खोकला आणि घसादुखीमध्ये अननसाचा रस ठरतो फायदेशीर

खोकल्यासाठी अननस - पौष्टिक आणि आरोग्यासाठी भरपूर फायदे असलेले अननस खोकला आणि घसादुखीसाठी खूप फायदेशीर आहे,
Pineapple Juice Cough Remedies
Pineapple Juice Cough RemediesDainik Gomantak

अननस पोषक तत्वांनी समृद्ध असण्याबरोबरच ते व्हिटॅमिन सी, तांबे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. अननस हे खाण्यासाठी खूप वेगळे आणि चवीला उत्तम आहे, जे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. अननसमध्ये असलेले एन्झाईम दाहक-विरोधी आणि उपचार गुणधर्मांनी समृद्ध असतात. म्हणूनच खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी अननसाचा रस वापरता येतो.

(Pineapple juice beneficial in cough and sore throat )

Pineapple Juice Cough Remedies
Astro Tips: काळ्या धाग्यात अशी कोणती शक्ती? जी तुम्हाला सुरक्षित ठेवते

हिवाळ्यात खोकला आणि घसा खवखवणे ही एक सामान्य समस्या आहे, अशावेळी घरगुती उपायांसाठी अननसाचा वापर केला जातो. चला जाणून घेऊया खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी अननसाच्या रसाचा योग्य वापर.

खोकला आणि घसादुखीमध्ये अननसाचे फायदे:

Healthline.com नुसार, अननसाच्या रसामध्ये अनेक निरोगी एन्झाईम्स आढळतात, ज्यामध्ये ब्रोमेलेन सर्व श्वसन समस्या, दमा आणि ऍलर्जीची लक्षणे कमी करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत खोकला आणि घसादुखीपासून लवकर आराम मिळवण्यासाठी तुम्ही औषधांसोबत अननसाचा रस घेऊ शकता.

अननसाचा रस घसा खवखवणे कमी करण्यासोबतच खोकल्यामुळे होणारी सूज कमी करतो. व्हिटॅमिन सी समृद्ध अननस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि संसर्गाशी लढण्याची शक्ती प्रदान करते.

Pineapple Juice Cough Remedies
Daily Horoscope 18 November : आज 'या' राशीच्या लोकांना मिळू शकते बढती; वाचा आजचे राशीभविष्य

अननसाचा रस वापरण्याची पद्धत:

अननसात मध, आले, मीठ आणि चिमूटभर लाल मिरची टाकून रस तयार करा. लाल मिरची घशात जमा झालेला श्लेष्मा काढून टाकण्याचे काम करते. आले आणि मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे खोकल्याच्या लक्षणांपासून घशातून आराम देतात. दिवसातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचे सेवन करा.

अननसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हिवाळ्याच्या सामान्य समस्यांपासून आराम मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com