मूळव्याध पुर्णपणे बरे करतील 'हे' 4 घरगुती उपाय

मूळव्याध (Piles) हा रोग बहुतांशवेळी वयस्कर लोकांना होतो, मात्र आज काल हा रोग आजकाल हा तरुणांना सुद्धा होताना दिसतोय.
Piles: Here's how you can cure the disease with home remedies
Piles: Here's how you can cure the disease with home remediesDainik Gomantak
Published on
Updated on

मूळव्याध (Piles) हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे. यामुळे पार्श्वभागावर अत्यंत वेदना होतात तसेच सूज येते. ज्यामुळे मूळव्याध झालेल्या रुग्णाला उठणे, बसणे आणि चालणे कठीण होते. हा रोग बहुतांशवेळी वाढत्या वयाच्या लोकांना होतो, मात्र आज काल हा रोग आजकाल हा तरुणांना सुद्धा होताना दिसतोय. चुकीचा आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे होणाऱ्या या रोगावर या 4 उत्तम उपायांच्या मदतीने मात करु शकाल

मूळव्याधातून मुक्त होण्यासाठी 4 घरगुती उपाय

1- कोरफड जेल

कोरफड वनस्पतीचे ताजे काढलेले जेल मूळव्याध झालेल्या भागावर लावणे फायदेशीर ठरते. दिवसातून 2 ते 4 वेळा लावल्यास दिसु शकतो चांगला परिणाम.

2- ताक

सुमारे 2 लिटर ताक घ्या आणि चवीनुसार 50 ग्रॅम ग्राउंड जिरे आणि मीठ घालुन हे ताक दिवसातून अनेक वेळा प्या. 3 ते 4 दिवस असे केल्याने मुळव्याधचा त्रास कमी होतो.

Piles: Here's how you can cure the disease with home remedies
Piles: बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाला देऊ शकते आमंत्रण

3- अंजीर

एक किंवा दोन वाळलेल्या अंजीर रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा, यामुळे मुळव्याधा रोगापासुन आराम मिळतो.

4- मोठी इलायची

तव्यावर सुमारे 50 ग्रॅम मोठी इलायची भाजून घ्यावी, थंड झाल्यावर बारीक करून त्याची पावडर बनवावी. सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे अर्धा चमचा पावडर पाण्यात टाकुन घेतल्याने मुळव्याध बरा होतो.

मूळव्याधची करणे

- बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध होऊ शकतात. बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नाही,त्यामुळे आतड्यावर जोर द्यावा लागतो. यामुळे सुद्धा मूळव्याधाची (Piles) समस्या निर्माण होऊ शकते.

- तसेच जे लोक दीर्घकाळ उभे राहून काम करतात त्यांनाही मूळव्याधाची (Piles) समस्या होऊ शकते.

- लठ्ठपणा देखील मूळव्याधाचा (Piles) त्रास होण्याचा एक महत्वाचे कारण आहे.

- तसेच अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान पाइल्सचा त्रास होऊ शकतो.

- तर अनेक महिलांना प्रसूतीनंतर ही समस्या निर्माण होऊ शकते.

- जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा हा त्रास होऊ शकतो.

मूळव्याधची लक्षणे

- शौचानंतर रक्तस्त्राव होणे

- गुदद्वारा भोवती सूज येणे.

- गुदद्वाराजवळ खाज सुटणे.

- शौचानंतर पोट साफ झाले नाही असे वाटणे.

- पाइल्समधून फक्त रक्त येणे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com