Astrology Tips For Selfie: तुमची सेल्फी काढण्याची पद्धत उलगडते तुमचे व्यक्तिमत्त्व

तुमची सेल्फी काढण्याची पद्धत सांगु शकते तुमचे व्यक्तिमत्त्व
Selfie Personality
Selfie PersonalityDainik Gomantak
Published on
Updated on

Selfie Style Personality Traits: आजकाल लोकांमध्ये सेल्फी घेण्याची खूप क्रेझ आहे. जगभरातील लोक मोबाईलवर सेल्फी काढतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. वेगवेगळ्या लोकांची सेल्फी घेण्याची स्टाइल वेगवेगळी असते. काही लोक पाऊट सेल्फी घेतात, काही लोक हसतमुख सेल्फी घेतात, काही त्यांच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करतात तर काही बॅकग्राउंडवर लक्ष केंद्रित करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही ज्या पद्धतीने सेल्फी काढता ते तुमचे व्यक्तिमत्त्व देखील उलगडते. तुम्ही सेल्फी घेता आणि त्यात तुम्ही कोणत्या प्रकारचा चेहरा बनवता किंवा कोणत्या अॅग्लने तुम्ही पोझ देता यावरुन तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्व काही सांगता येते.

पाऊट सेल्फी

पाऊट किंवा डक सेल्फीची क्रेझ खासकरून तरुणांमध्ये दिसून येते. अशी सेल्फी तुम्हाला आवडत असेल तर ते चांगले लक्षण मानले जात नाही. व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर असे लोक भावनांच्या बाबतीत कधीही स्थिर नसतात.

कॅमेरावर फोकस करणे

जर तुम्ही सेल्फी घेताना चेहऱ्यावर (Face) कोणतेही भाव न दाखवता सेल्फी घेत असाल तर ते खूप चांगले व्यक्तिमत्वाचे मानले जातात. हे तुमच्यामध्ये असलेल्या लीडरची गुणवत्ता दर्शवते.

हसतांना सेल्फी

जे लोक मोठमोठ्याने हसत सेल्फी घेतात किंवा मोठे स्माईल देतात, ते लोक खुप अनुभवी असतात. अशा लोकांची विचारसरणी सकारात्मक असते आणि ते आपले म्हणणे सर्वांसमोर खुले ठेवतात.

Selfie Personality
Feng Shui Tips: घरात 'मनी कॅट' ठेवल्याने नांदेल सुख-शांती

जीभ बाहेर काढून सेल्फी

काही लोक सेल्फी घेताना जीभ बाहेर काढतात. अशा लोक प्रेमळ असतात. जे त्यांच्या जीवनाचा मनमोकळेपणाने आनंद घेतात.

मेकअप आणि मेकअपशिवाय सेल्फी

काही मुलींना मेकअपसह (Makeup) सेल्फी घेणे आवडते तर काहींना मेकअपशिवाय सेल्फीमध्येही आराम मिळतो. मेकअपसोबत क्लोज-अप सेल्फी घेणाऱ्या मुली सौंदर्याबाबत जागरूक असतात. दुसरीकडे, मेकअपशिवाय सेल्फी घेणार्‍या मुली (Girl) अधिक आत्मविश्वासी असतात.

हाई एंड लो अॅगल सेल्फी

हात वर करून सेल्फी घेण्यास हाय अँगल सेल्फी म्हणतात. असे लोक थोडेसे स्वार्थी प्रकारचे असतात. दुसरीकडे, लो अँगल सेल्फी म्हणजे कॅमेऱ्यासमोर आणि कमी उंचीवर सेल्फी घेणारे लोक लाजाळू व्यक्तिमत्त्वाचे असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com