Perfume Ban in Flight: फ्लाइटमध्ये परफ्यूम वापरण्यावर बंदी? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Perfume Ban in Flight: आता पायलट आणि क्रू मेंबर्सना फ्लाइट ऑपरेशन्स दरम्यान परफ्यूम वापरण्यास बंदी घातली जाऊ शकते. डीजीसीएने हा प्रस्ताव दिला आहे.
Goa-Bhopal Flight
Goa-Bhopal FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Perfume Ban in Flight:  भारतात वैमानिक आणि विमान चालक दलातील सदस्यांद्वारे परफ्यूम वापरण्यावर बंदी असू शकते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हा प्रस्ताव दिला आहे. याला मंजुरी मिळाल्यास, पायलट आणि फ्लाइट क्रू मेंबर्सना फ्लाइट दरम्यान परफ्यूम घालण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Goa-Bhopal Flight
DIGILocker: सावधान! पासपोर्टसाठी डिजीलॉकरमधील कागदपत्रांचा अवलंब करताय?

असे करताना आढळणाऱ्यांवर डीजीसीए कारवाई करू शकते. CNBC च्या रिपोर्टनुसार, परफ्यूम व्यतिरिक्त, ज्या औषधे आणि माउथवॉश उत्पादनांवर अल्कोहोल आहे त्यावरही बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या उत्पादनांमुळे, श्वासोच्छवासाच्या चाचणीवर परिणाम होऊ शकतो.

Goa-Bhopal Flight
Laser Eye Surgery: आता अवघ्या 15 मिनिटांत चष्म्यापासून मिळेल सुटका ...

वैद्यकीय चाचणीच्या पद्धतीत होणार बदल

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अलीकडेच आपल्या वैद्यकीय चाचणीच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी मद्य सेवन तपासण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहे. DGCA ने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की आता क्रू मेंबर्स किंवा पायलट अल्कोहोल असलेले कोणतेही औषध, परफ्यूम किंवा दंत उत्पादने वापरणार नाहीत.

यामुळे चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ शकते. यासोबतच या प्रस्तावात असेही म्हटले आहे की, जर कोणत्याही क्रू मेंबरने असे औषध घेतले तर त्याला त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

परफ्युमवर बंदी घालण्यामागचे कारण काय?

परफ्यूममध्ये अल्कोहोलची थोडीशी मात्रा असते. अशा परिस्थितीत, परफ्यूममध्ये असलेले थोडेसे अल्कोहोल श्वास विश्लेषक चाचणीवर परिणाम करू शकते की नाही हे प्रस्तावित अहवालात स्पष्ट नाही. भारतातील विमान कंपन्यांमधील पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी दारूशी संबंधित नियम अतिशय कडक आहेत. अशा परिस्थितीत, एअरलाइन्स आणि डीजीसीए या दोन्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली ही चाचणी करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com