Parenting Tips: पालक अन् मुलांमध्ये गैरसमज होत असेल कर फॉलो करा 'या' टिप्स

मुल आणि पालकांमध्ये गैरसमज कमी करायचा असेल तर तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.
Parenting Tips
Parenting TipsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Parenting Tips: आजकाल पालक आणि मुलांमध्ये गैरसमज वाढत आहे. हे खरे आहे की वेगाने बदलणाऱ्या समाजात पालकत्व खूप गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक झाले आहे. अशावेळी मुलांच्या भावना समजून घेणे पालकांना आता सोपे राहिलेले नाही.

सोशल मीडियाचा वाढता वापरामुळे मुलांचे स्वतःचे त्रास आणि समस्या असतात. आजच्या मुलांशी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पालकांना अधिक प्रयत्न करावे लागतील. तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुढील टिप्स फॉलो करू शकता.

  • मुलांनाही तणाव जाणवतो

आजकाल मुलांमध्ये तणाव आणि चिंता सामान्य आहे. अनेक पालक त्यांच्या मुलांमध्ये सुरू झालेल्या या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मुलांशी यासमदर्भात बोलणे आणि गरज पडल्यास त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

  • भावना

आजकाल मुलं अनेक प्रकारच्या भावनांमधून जातात. आजच्या मुलांचे जीवन पुर्वीच्या पिढीच्या मुलांपेक्षा अधिक गुंतागुंतीचे आहे. अशावेळी पालकांनी त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या वेळेची पुन्हा पुन्हा तुलना करून फायदा होणार नाही. त्यांच्या मनात काय आहे ते सांगण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.

  • प्रत्येक मूल वेगळे असते

प्रत्येक मुलाचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव वेगळा असतो. सर्वात पहिले त्याला तो आहे तसा स्वीकारा. मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. अनेक पालकांना त्यांच्या मुलाच्या वेगळेपणाकडे दुर्लक्ष करायचे असते आणि त्याला इतरांसारखे पाहायचे असते, असे केल्याने तुमचे मूल तुमच्यापासून दूर होऊ शकते.

  • स्वातंत्र्य

आजकालच्या मुलांना स्वातंत्र्य हवे आहे. पालकांना स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्यासाठी मर्यादा निश्चित करणे यात संतुलन साधणे सोपे नाही. मुलांना काही करण्यापासून रोखायचे असेल, तर त्याचे कारण स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. तुम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीवर आणि वागण्यावर लक्ष ठेवून आहात असे मुलांना वाटू देऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com