Yashaswini 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘यशस्विनी- 2024’ चे आयोजन

Yashaswini 2024: संस्कृती भवन बहुउद्देशीय सभागृह, पणजी येथे गोवा 14 मार्च 2024 रोजी लायव्हलीहुडस फोरम, कला आणि संस्कृती संचालनालय, जेसीआय-म्हापसा आणि मानस डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशस्विनी- 2024’ चे आयोजन केले गेले.
Yashaswini 2024:
Yashaswini 2024:Dainik Gomantak
Published on
Updated on

Yashaswini 2024:

संस्कृती भवन बहुउद्देशीय सभागृह, पणजी येथे गोवा 14 मार्च 2024 रोजी लायव्हलीहुडस फोरम, कला आणि संस्कृती संचालनालय, जेसीआय-म्हापसा आणि मानस डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशस्विनी- 2024’ चे आयोजन केले गेले.

या अनोख्या कार्यक्रमात ‘शाश्वतता’ या महत्वाच्या विषयाकडे लक्ष केंद्रित करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. ‘अर्ज’ या संस्थेमार्फत चालवल्या जाणार्‍या ‘वीश- गोवा’ या उपक्रमाच्या संचालिका श्रीमती ज्युलियाना लोहार यांचा, त्या करत असलेल्या उपेक्षित समुदायांच्या पुनर्वसनाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

शाश्वततेच्या विषयावर आधारित या कार्यक्रमात फॅशन शो, टिकाऊ उत्पादन प्रदर्शन आणि पिचिंग स्पर्धा याचा समावेश होता. गोव्यातील 20 प्रेरणादायी महिला त्यात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाद्वारे सर्जनशीलता आणि हरित भविष्यासाठी त्यांनी आपली वचनबद्धता दर्शविली.

Yashaswini 2024:
Summer In Goa: उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी फळे ठरतात अमृतासमान

ही  संध्याकाळ प्रेरणादायी आणि टिकाऊ उत्पादनांच्या सुंदर प्रदर्शनाने भरलेली होती.  पिचिंग स्पर्धेत स्नेहा नाईक यांना ‘सुश्री यशस्विनी 2024 - सस्टेनेबिलिटी वॉरियर’ हे बिरूद व रु. 9,000. चे रोख पारितोषिक मिळाले. कु. व्हेनेशिया वाझ जॉर्ज आणि कु. श्रेया वझरकर यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेतेपद आणि रु. 6,000 आणि रु. 4,000 रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कु. क्षितिजा साळगावकर हिने तृतीय उपविजेतेपद आणि रु. 2,000 पटकावले. मानस डेव्हलपर्सने ही बक्षिसे प्रायोजित केली होती.

‘गोवा लायव्हलीहुडस फोरम’ने सर्वोत्कृष्ट रॅम्प वॉक आणि सर्वोत्कृष्ट ड्रेस्ड कॅटेगरीसाठी विशेष पारितोषिकेही प्रदान केली. ‘यशस्विनी- 2024" ने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोव्यातील स्त्रीत्वाची भावना साजरी करण्यसाठी एक व्यापक व्यासपीठ म्हणून काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com