Oil-Free Breakfast: नाश्त्यात तेलकट पदार्थ खायचे नसेल तर 'हे' ऑइल फ्री डिशेज नक्की ट्राय करा

Oil-Free Breakfast: दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे.
Oil-Free Breakfast
Oil-Free BreakfastDainik Gomantak
Published on
Updated on

Oil-Free Breakfast: दिवसाची उत्साही सुरुवात करण्यासाठी सकाळी नाश्ता करणे खूप महत्त्वाचा आहे. नाश्ता न केल्याने दिवसभर चिडचिड, थकवा, अॅसिडिटी अशा अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून, तुमच्या दिवसाची सुरूवात नाश्ताने करणे खूप महत्वाचे आहे. परंतु सकाळी जास्त तेलकट पदार्थ खावेसे वाटत नाही. सकाळी ऑइल फी पदार्थांचा नाश्तात समावेश करणे आरोग्यदायी मानले जाते.

फ्रुट सॅलड

आहारात हंगामी फळांचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. हे आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे प्रदान करतात. तसेच, फळं खाल्ल्याने फायबर मिळते, जे फळांच्या रसातून मिळत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात दोन किंवा तीन प्रकारच्या फळांचा समावेश करून तुम्ही सॅलड बनवू शकता.

पोहे

पोहे हा एक अतिशय प्रसिद्ध भारतीय पदार्थ आहे. त्यात शेंगदाणे, कांदा, कढीपत्ता यांसारख्या गोष्टी टाकल्या जातात. ते पदार्थ खूप पौष्टिक असतात. तुम्ही सकाळी सहज बनवू शकता आणि ते खायला खूप चवदार आहे.

टोस्ट

नाश्त्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे टोस्ट. हे बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि खायलाही स्वादिष्ट आहे. यासोबत तुम्ही पीनट बटर, केळ्याचे तुकडे किंवा मॅश केलेला एवोकॅडो खाऊ शकता. यामुळे आरोग्य निरोगी राहते.

स्प्राउट्स चाट

स्प्राउट्स अतिशय पौष्टिक असतात. यासाठी हरभरा किंवा मूग एक-दोन रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ओल्या सुती कपड्यात बांधून ठेवा. यामुळे त्यांना कोंब फुटतील आणि मऊही होतील. या स्प्राउट्सचा चाट तुम्ही नाश्त्यात बनवू शकता. कांदा, चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला आणि तुमची चाट तयार आहे.

इडली

तांदूळ आणि उडीद डाळ आंबवून इडली बनवली जाते. त्यामुळे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत नाश्त्यात खाऊ शकता. खायला चविष्ट आहे आणि पोट देखील भरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com