हिवाळ्यात (winter) गुळ आणि मेथीचे लाडू (Laddu) पाहण्याची मज्जाचा वेगळी असते. गुळ मेथीचे लाडू केवळ चवीला टेस्टी नसून आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देखील वाढवण्यास मदत करते. चला मग जाणून घेऊया, गूळ मेथीचे लाडू कसे तयार केले जातात.
साहित्य:
100 ग्रॅम मेथीचे दाणे
1/2 लिटर दूध
300 ग्रॅम गव्हाचे पीठ
250 ग्रॅम तूप
100 ग्रॅम डिंक
30 -50 बदाम
300 ग्रॅम गुळ किंवा साखर
8 ते 10 चमचे काळे मिरे
2 चमचे जिरा पावडर
10 छोटी विलायची
4 तुकडे दालचिनी
2 जायफळ
कृती:
कृती:
लाडू तयार करण्यापूर्वी सर्वातआधी मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर एक पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवावे. यात बारीक केलेली मेथी ८ ते १० तास भिजत ठेवावे. नंतर काळी मिरे, जायफळ, विलायची, दालचिनी चांगले बारीक करून घ्यावे. नंतर आता एक कढईत अर्धा वाटी तूप टाकून भिजत ठेवलेली मेथी टाकावी आणि मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. यानंतर एका पॅनमध्ये गुळ पातळ करून करून घ्यावा. यात जिरेपूड, सुंठपावडर, बदामाचे काप, दालचिनी, जायफळ आणि विलायची घालून चांगले मिक्स करावे. यात नंतर भाजलेली मेथी, भाजलेले पीठ भाजलेले डिंक घालून चांगले मिक्स करावे. तयार आहे मेथी गुळ लाडूंचे मिश्रण. या मिश्रणाचे लाडू तयार झाल्यानंतर थोड्या वेळाने हवाबंद डब्ब्यात ठेवावे. मेथीचे लाडू खाल्ल्याने हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहून अनेक आजार दूर राहतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.