Nokia ने लाँच केला सर्वात स्वस्त 5G फोन, जबरदस्त बॅटरी अन् डिझाइन आहे खास...

Nokia ने भारतात लाँच Nokia G42 केला असून त्यात जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे.
Nokia G42
Nokia G42Dainik Gomantak
Published on
Updated on

नोकीयाने भारतीय मार्केटमध्ये आपला Nokia G42 हा नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोन क्वालकॉम स्नैपड्रॅगन 480+ SoC द्वारे समर्थित आहे. तुम्हाला बजेटमध्ये 5G फोन खरेदी करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय असू शकतो. फोन Android 13 वर चालतो. Nokia G42 5G ची किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • वैशिष्ट्ये

Nokia G42 मध्ये 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. त्‍याच्‍या डिस्‍प्‍लेमध्‍ये 450 nits ची ब्राइटनेस आहे, त्‍याच्‍यासोबत फोनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग ग्लास 3 देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आहे. डिव्हाइसमध्ये 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. 50 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि 2 एमपी मॅक्रो कॅमेरा देणयात आला आहे. या सोयीमुळे तुम्ही फोटोग्राफीचा आनंद घेऊ शकता. फ्रंट कॅमेरा 8 एमपीचा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून फास्ट चार्ज होते.

Nokia G42
Hair Style Hacks: चमकदार अन् स्ट्रेट केस हवे आहेत? मग, फॉलो या '4' करा सिंपल ट्रिक्स
  • किंमत

नोकिया G42 ची भारतात किंमत 12,599 रुपये आहे. हा फोन पर्पल आणि ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री 15 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि हा फोन नोकीयाच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर खरेदी करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com