Five Star Hotels: ... म्हणून पंचतारांकित हॉटेल्समध्ये सीलिंग फॅन नसतात

पंचतारांकित हॉटेल्समध्ये सीलिंग फॅन नसण्यामागे कोणती कारणे असु शकतात हे जाणून घेऊया.
Five Star Hotels
Five Star Hotels Dainik Gomantak
Published on
Updated on

Five Star Hotels: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या रूम सर्व्हिसचा आनंद घ्यायला कोणाला आवडत नाही. अनेक लोक पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याचा आनंद घेतात. पंचतारांकित हॉटेल्समध्ये गेल्यावर तिथील रूममध्ये तुम्हाला पंखे दिसणार नाहीत. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की यासारख्या हॉटेल्समध्ये पंखे का नसतात? यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.

पंख्याची देखभाल

पंख्याची सारखी काळजी घ्यावी लागते. तसेच त्यांची स्वच्छता देखील ठेवावी लागते. पंख्याची मोटर, ब्लेड यासारख्या वस्तुंची काळजी घ्यावी लागते. तसेच जर हॉटेल्समध्ये सेंट्रल कूलिंग सिस्टीम ऐवजी खोलीत वेगळी कूलिंग सिस्टीम असेल तर पंखे इत्यादी चालूच राहतील त्यामुळे मोटार जळु शकतात.

पंखे लावण्याचा खर्च

पंखे बसवण्याचा खर्च तुमच्या घरातील एसीच्या तुलनेत कमी असू शकतो. पण जर तुम्ही 500 रूममध्ये दोन पंखे बसवण्याचा विचार करत असाल तर ते महागात पडू शकते. यामुळे अनेक हॉटेल्समध्ये सेंट्रल एसी लावण्यात येते. याची काळजी घेणे देखील सोपे असते.

Five Star Hotels
Korean Hair Care Routine: घनदाट केसांसाठी फॉलो करा कोरियन टिप्स

पंख्यापासून इजा होऊ शकते

अनेक हॉटेल्समध्ये पंख्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. अनेक हॉटेलमधील बेड हे स्प्रिंगचे असतात. जर कोणी चुकून त्यावर उडी मारली तर तुमचे डोके थेट पंख्याला लागू शकते आणि तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्यांना अशा समस्यांना अधिक सामोरे जावे लागते. यामुळे हॉटेल्स रूममध्ये पंखे नसतात.

पंखे स्वच्छ करणे

हॉटेल्समध्ये पंखे नसण्यामागे हे एक कारण असु शकते. पंखे स्वच्छ न केल्यास गेस्ट रूम बुक करणार नाही आणि होटेल्सच्या रिव्ह्युवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच पंखे स्वच्छ करण्यासाठी कामावर मानसे ठेवावे लागतील आणि त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी अनेक हॉटेल्समध्ये पंखे नसतात.

तापमान कंट्रोलमध्ये राहते

आता सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे हॉटेल्समधील प्रत्येक खोलीत आणि कॉमन एरियामध्ये तापमान एकाच पद्धतीने नियंत्रित करता येत नाही. त्यामुळे तापमान नियंत्रणात अडचण येऊ नये म्हणून पंखे बसवलेले नसतात. त्यामुळे तुम्हाला जर एसीची समस्या असेल तर रूममध्ये पंखा आहे की नाही याची खात्री करू घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com