Night Shift मध्ये काम करता? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

Night Shift मध्ये काम करतात त्यांना संभवतात 'हे' आजार
Night Shift
Night Shift Dainik Gomantak
Published on
Updated on

आपल्यापैकी बरेच जण आयुष्य सुरळीत चालवण्याचा प्रयत्न करत राहतात.काही व्यवसाय करतात, तर काही नोकरी करून पैसे कमवतात आणि घर चालवतात. काही नोकरदार लोक देखील आहेत जे जबाबदारीच्या ओझ्यासारख्या अनेक कारणांमुळे रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. रात्रीच्या वेळी जेव्हा बहुतेक लोक झोपलेले असतात, त्या वेळी काहींना जागून त्यांचे काम करावे लागते.

Night Shift
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती चालले पाहिजे? जाणून घ्या

अशी दिनचर्या सतत पाळल्याने शरीर रोगांचे किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांचे घर बनू लागते. कुठेतरी तुम्हीही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याचा रुटीन पाळत नाही. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की यामुळे कोणते आजार किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

Night Shift
हिवाळ्यात 'ही' लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी साधा संपर्क

तर मानसिक स्वास्थ सुधारण्यास मदत होईल

अनेक संशोधन किंवा अभ्यासातून हे समोर आले आहे की जे लोक रात्री जागून काम करतात, त्यांना इतरांपेक्षा जास्त बिघडलेल्या मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, रात्री काम करणाऱ्यांच्या मनावर केमिकलचा वाईट परिणाम होतो.

मानसिक आरोग्य बिघडल्याने कामावरही परिणाम होतो. जे या नित्यक्रमाचे पालन करतात ते दररोज 10 मिनिटे ध्यान करून त्यांचे मानसिक आरोग्य राखू शकतात. यामूळे दिवसेंदिवस आपले मानसिक स्वास्थ सुधारण्याला मदत होऊ शकते.

हृदयरोग

वेबएमडी या इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जे लोक कमी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. रात्रपाळीत काम करणाऱ्यांमध्ये दर पाच वर्षांनी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका काही टक्क्यांनी वाढतो, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, खराब जीवनशैलीमुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि अशा स्थितीत हृदयविकार वाढू लागतात.

मेटाबॉलिक सिंड्रोम

जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका असतो. या स्थितीत उच्च रक्तदाब, उच्च साखर, वाढते वजन आणि कोलेस्टेरॉलची बिघडलेली पातळी यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू लागतात. रात्रपाळीत काम करणाऱ्यांना जागरण करावे लागतेच, पण जेवणाची काळजी घेऊन तेही निरोगी राहू शकतात. यासाठी रात्री एकदा कोमट पाणी प्या आणि शक्यतो हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा.

व्हिटॅमिन डीची कमतरता

रात्री कामगारांना अनेकदा सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे शरीरात इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. काही मिनिटे सूर्यप्रकाश घेण्याचा नित्यक्रम पाळण्याचा प्रयत्न करा. या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहेत . दैनिक गोमतंक याची पुष्टी करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे अनुसरण करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com