Newborn Baby Health: पालकांनो, सतर्क राहा! नवजात बाळामध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Newborn Health And Safety: नवजात बाळाच्या काळजीमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कारण नवजात बाळ खूप नाजूक असते.
Newborn Health And Safety
Newborn Baby HealthDainik Gomantak
Published on
Updated on

Newborn Care Warning Signs Parents Should Not Ignore

नवजात बाळाच्या काळजीमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कारण नवजात बाळ खूप नाजूक असते. त्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. लहान मुलांच्या हालचाली आणि बदलांकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. अगदी थोडासा निष्काळजीपणाही नवजात बाळामध्ये समस्या निर्माण करु शकतो. अशा परिस्थितीत नवजात बाळाकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. बऱ्याचदा आपण अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतो जे एखाद्या मोठ्या आणि गंभीर आजाराचे संकेत ठरु शकतात. उदाहरणार्थ, जर बाळ खूप झोपलेले असेल, दूध पीत नसेल किंवा वारंवार अशक्त वाटत असेल, तर ही चिंतेची बाब असू शकते.

जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये ही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्याच्या समस्येचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करा. चला तर मग नवजात बाळात होणाऱ्या समस्या कशा दूर करायच्या हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.

Newborn Health And Safety
Blood Cancer: ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष करणं प्राणघातक ठरू शकतं

तज्ञ डॉक्टर काय सांगतात?

यशोदा रुग्णालयातील वरिष्ठ नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. दीपिका रस्तोगी यांनी सांगितले की, जर बाळाला ताप असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. विशेषतः जेव्हा ताप 100 अंशांपेक्षा जास्त असतो. हे संसर्गाचे लक्षण असू शकते. विशेषतः जन्माच्या पहिल्या महिन्यात ते खूप धोकादायक असू शकते. याशिवाय, जर नवजाताला अचानक जास्त तहान लागली तर तुम्ही याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधला पाहिजे. तसेच, जर इतर काही कारणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

श्वास घेण्यात अडचण

जर मूल खूप वेगाने श्वास घेत असेल, त्याच्या नाकातून शिट्टीचा आवाज येत असेल किंवा श्वास घेताना त्याच्या नाकपुड्या फुगत असतील, तर हे न्यूमोनिया किंवा फुफ्फुसांशी संबंधित इतर समस्येचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, उशीर न करता डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

वारंवार उलट्या होणे

जर बाळाला दूध पिल्यानंतर प्रत्येक वेळी उलट्या होत असतील किंवा त्याच्या उलटीचा रंग हिरवा असेल तर ते आतड्यांसंबंधी काही समस्येचे लक्षण असू शकते. सतत उलट्या होण्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो, म्हणून ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Newborn Health And Safety
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

सतत झटके येणे

जर मूलाला वारंवार झटके येत असतील आणि अचानक डोळे फिरवत असेल किंवा त्याचे शरीर खूप कडक होत असेल, तर हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. उशीर न करता डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

खूप रडणे किंवा अजिबात न रडणे

जर मूल सतत रडत असेल आणि कोणत्याही प्रकारे थांबत नसेल किंवा पूर्णपणे शांत पडून असेल आणि रडत नसेल, तर हे एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते.

लघवी आणि मल मध्ये अडचण

जर बाळ 24 तासांतून एकदाही लघवी करत नसेल, मल पांढरे किंवा काळे दिसत असेल किंवा तीव्र बद्धकोष्ठता असेल, तर ती पचनक्रिया किंवा मूत्रपिंडाची समस्या असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com