New Shoes: शुजच्या दुकानात जाऊन शूज खरेदी करणे इतके सोपे नाही. त्यांची फिटिंग, डिझाईन, रंग, कम्फर्ट सगळं बघावं लागतं. प्रत्येकाला असे फुटवेअर खरेदी करायचे असतात, जे घातल्यानंतर पायांना आराम वाटेल. यामुळेच लोक फुटवेअरवर चांगलाच खर्च करतात.
अनेक वेळा नवीन शूज घातल्यानंतर शूज कापण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. जेव्हा शूज त्वचेला घासतो तेव्हा फोड तयार होतात. ज्यामुळे चालताना किंवा धावताना अस्वस्थता येते. जरी कधीकधी शूज बदलणे हा एक पर्याय असतो. परंतु जर तुम्ही असे न करता या दुखण्यावर औषध शोधत असाल तर काळजी करू नका. शूज चावणे टाळण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
टाइट शुज गालू नका
शूज खरेदी करताना तुमच्या पायाची बोटे दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. असे होत असल्यास तुमचे पाय सुजतात. चपला चावणे आणि फोड टाळण्यासाठी, तुम्ही अर्धा किंवा एक आकार मोठा बूट खरेदी करावा.
कुशन्ड इन्सोल असलेले शुज निवडावे
हार्ड किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या शूजमुळे अनेकदा नवे शूज चावतात. जर तुम्हाला प्रत्येक वेळी ही समस्या येत असेल तर, लेदर किंवा कॅनव्हासचे मऊ आणि श्वास घेण्यायोग्य शूज खरेदी करावा. यामुळे नवे शूज चावण्याची शक्यता कमी होते. अधिक आरामासाठी, फक्त कुशन्ड असलेले शूजच खरेदी करावेत.
व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचा वापर
नवा शूज चावणे टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे तुमच्या शूजच्या आतील बाजूस मऊ करणे. तुम्ही तुमच्या शूजवर व्हॅसलीन पेट्रोलियम जेली लावून हे करू शकता. पायांना जास्त दुखापत होईल अशा ठिकाणी लावावे.
ओलावा कमी करणारे मोजे घालावे
ओलावा दूर करू शकणारे मोजे घालावे. अशा सॉक्समध्ये पाय आणि बूट यांच्यातील घर्षण कमी करण्याची गुणवत्ता असते. ज्यामुळे बूट कापण्याचा धोका कमी होतो. हे मोजे तुमचे पाय कोरडे ठेवण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले असातात. यामुळे फोडांचा धोका कमी होतो.
पॅड घालावे
आजकाल शूजच्या आत घालण्यासाठी पॅड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. शूज आरामदायक बनवणारे पॅड तुम्ही निवडू शकता. त्यांच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ किंवा फोड येत नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.