New Cloths Hacks: नव्या कपड्यांचा रंग अन् चमक टिकून राहण्यासाठी अशी घ्या काळजी

नवीन कपडे घालण्यापुर्वी ते धुणे गरजचं असतं. नव्या कपड्यांची चमक आणि रंग टिकून राहतो.
New Cloths Hacks
New Cloths HacksDainik Gomantak
Published on
Updated on

New Cloths Hacks: सणासुदीच्या काळात अनेक लोक नवे कपडे खरेदी करतात. अनेक ऑनलाइन साइटवर देखील सणासुदीच्या काळात अत्यंत स्वस्त किंमतीत कपडे विकले जातात. त्यामुळे अशा ऑफर्स पाहून तुम्ही कपडे खरेदी करू नका. तर अनेक लोक नवे कपडे न धुतांच घालतात. असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण नव्या कपड्यांमध्ये बॅक्टेरिया असु शकतात. तुम्हाला जर नव्या कपड्याची चमक आणि रंग टिकुन ठेवायचा अशेल तर पुढिल गोष्टीची काळजी घेऊ शकता.

  • कपड्यांची चमक कायम राहावी

तुम्हालाही वर्षानुवर्षे नवीन कपड्यांची चमक कायम ठेवायची असेल तर धुतांना काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी अर्ध्या बादली पाण्यात एक चमचा शॅम्पू, मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करावा. आता सर्व नवीन कपडे त्यात भिजवून 10-12 तास ठेवावे. नंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे आणि सुर्यप्रकाशात वाळवा.

  • नव्या कपड्यांचा रंग जाणार नाही

नवीन कपडे घालण्यापूर्वी मीठ किंवा तुरटी मिक्स केलेल्या पाण्यात धुवावे. यामुळे नव्या कपड्यांचा रंग जाणार नाही. यासाठी एका मोठ्या बादलीमध्ये थंड पाणी भरून त्यात बारिक केलेली तुरटी आणि 2-3 चमचे मीठ टाकावे. नंतर चांगले मिक्स करावे. पाणी पांढरे दिसू लागल्यावर त्यात 15 मिनिटं कपडे भिजत ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून वाळवावे.

  • इतर उपाय

नव्याकोऱ्या कपड्यांचा चमक आणि रंग कायम ठेवण्यासाठी हा उपाय देखील उत्त्म आहे. यासाठी 1 चमचा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करावा. नंतर या पाण्यात कपडे भिजवावे. यामुळे कपड्यांची चमक कायम राहिल आणि निर्जंतुकही होतात.

  • या गोष्टी लक्षात ठेवा

नवे कपडे कायम नवीन दिसण्यासाठी नेहमी टॅगवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

तसेच तुम्ही जर वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असाल तर लिक्विड डिटर्जंट वापरावे.

नवे कपडे गरम पाण्याने कपडे धुणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com