Google Search: चुकूनही गुगलवर 'हे' सर्च करू नका, होऊ शकतो तुरुंगवास

गुगलवर अनेक चांगल्या गोष्टींसह समाज विघातक गोष्टी देखील सर्च केल्या जात आहेत.
Google Search
Google SearchDainik Gomantak
Published on
Updated on

Google: हर सवाल का जबाब गुगल है! अशीच आजकाल प्रत्येकाची मानसिकता झाली आहे. काहीही शोधायचं म्हटलं किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर, आपण गुगल (Google) बाबाला विचारतो आणि एका क्षणात हजारो सर्च रिझल्ट (Search Result) डोळ्यासमोर येतात. गुगलचा वापर अगदी सामान्य झाला असून, चांगल्या गोष्टींसह अनेक समाज विघातक गोष्टी देखील सर्च केल्या जात आहेत. त्याविरोधात आता कडक कारवाई केली जाणार असून, यामध्ये तुरुंगवास (Jail) देखील होण्याची शक्यता आहे.

Google Search
Madgaon Mayor Election : तिढा सुटणार; दामोदर शिरोडकर होणार मडगावचे नवे नगराध्यक्ष

चाइल्ड पोर्नोग्राफी (Child Pornography)

बाल लैगिंक साहित्याविरोधात सरकार आणि केंद्रीय यंत्रणा खूप सतर्क झाल्या आहेत. यासाठी विविध तपास यंत्रणांकडून देशात छापे टाकून अनेकांना अटक करण्यात आली. त्यामुळे गुगलवर तुम्ही कधीही चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित काहीही शोधले तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. तसेच, दंडही भरावा लागू शकतो.

चाइल्ड पोर्नोग्राफी हा अतिशय संवेदनशील विषय असून, त्यासंबधित काहीही गुगलवर शोधणे धोकादायक ठरू शकते.

चित्रपट पायरसी (Film Piracy)

नवा एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज आली की लगेच ती फुकटात पाहण्यासाठी अनेकजण धडपड करतात. मग तो विविध संकेतस्थळावरून मिळविण्यासाठी अनेक सर्च केल्या जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का चित्रपट पायरसी हा गुन्हा आहे. त्यामुळे गुगलवर चित्रपटाचे पायरेटिंग संबंधित काहीही शोध घेतल्यास, तुरुंगवास होऊ शकतो. तसेच, तुम्हाला दंड देखील होऊ शकतो.

Google Search
Goa Accident : वाढत्या रस्‍ते अपघातांवर आता ‘सीसीटीव्‍ही’चा उतारा

बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया (Bomb Making Process)

या यादीत सर्वात शेवटचा विषय आहे तो म्हणजे बॉम्ब संबधित माहितीचा. बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असे काही सर्च केल्यास तुम्हाला तुरूंगवास भोगावा लागू शकतो. गुगलवर तुम्ही बॉम्ब संबधित असे काही सर्च करता तेव्हा तुमचा आयपी अॅड्रेस थेट सुरक्षा यंत्रणांपर्यंत जातो. त्यानंतर सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकतात.

गुगल माहितीचे भंडार आहे. त्यावर अनेक प्रकारची माहिती आणि ज्ञान उपलब्ध आहे. पण, त्याचा वापर करताना सामाजिक भान ठेवणे महत्वाचे आहे. तसेच, आपल्या सर्चमुळे सरकारी नियमांचे उल्लघंन होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com