Food in Refrigerator: किचनमधील 'या' गोष्टी कधीही फ्रीजमध्ये ठेऊ नका; नाहीतर...

फ्रिजमध्ये काही खाद्यपदार्थ ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते.
Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak
Published on
Updated on

भाज्या असोत की दूध, फळे असोत, भाजी असो किंवा मैदा-भाकरी असो, बहुतांश गोष्टी साठवण्यासाठी फ्रीजची मदत घेतली जाते. परंतु काही गोष्टी किंवा खाद्यपदार्थ असे आहेत जे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी विचार करणे आणि समजून घेणे आवश्यक आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का? फ्रिजमध्ये काही खाद्यपदार्थ ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. असे केल्याने केवळ गोष्टींचे पौष्टिक मूल्य कमी होत नाही, उलट त्याची चवही बदलते आणि त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

Food in Refrigerator
Jaggery Benefits: जेवणानंतर गूळ खाण्याने शरीराला होतात 'हे' फायदे; तुमचे वजनही राहते नियंत्रणात

केळी

केळी ठेवण्यासाठी बहुतेक लोक फ्रीजची मदत घेतात. पण फ्रीजमध्ये ठेवल्याने केळी लवकर काळी पडतात. एवढेच नाही तर केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने इथिलीन गॅस बाहेर पडतो, जो फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर गोष्टींसाठीही हानिकारक ठरू शकतो.

Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak

टरबूज-खरबूज

टरबूज आणि खरबूज फ्रीजमध्ये ठेवणे टाळा, विशेषतः ते अर्धे कापल्यानंतर ठेऊ नये. असे केल्याने या फळांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स नष्ट होतात, तसेच त्यांची चवही बदलू लागते.

Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak

मध

मधही फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. वास्तविक मध फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा रंग आणि रूप बदलते. असे केल्याने, मधामध्ये क्रिस्टल्स तयार होतात, जे आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाहीत.

Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak

संत्री-लिंबू

संत्री आणि लिंबू यांसारखी सायट्रिक फळेही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. या गोष्टी आम्लयुक्त आहेत आणि त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास, थंड तापमान त्यांना लवकर खराब करू शकते.

Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak

ब्रेड

बाजारातून ब्रेड आणताच लोक प्रथम फ्रिजमध्ये ठेवतात. ब्रेड फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे कारण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर सुकायला लागते. त्यामुळे त्याची चवही बदलते.

Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak

टोमॅटो

टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोची वरची त्वचा कुजण्यास सुरुवात होते, त्यासोबतच ते लवकर खराब होतात. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात.

Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak

बटाटे

बरेच लोक बटाटे मोठ्या प्रमाणात घेतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च खराब होते. त्यामुळे त्याची चव खूप खराब होऊ शकते.

Food in Refrigerator
Food in RefrigeratorDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com