Vastu Shastra Tips: कंगाली कडे घेऊन जाणारी 'ही' मूर्ती घरात चुकूनही ठेवू नका

Vastu tips in marathi, directions problems remedy
Vastu tips in marathi, directions problems remedyDainik Gomantak

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) घरातील प्रत्येक वस्तूमुळे आपल्यावर चांगला, वाईट प्रभाव पडत असतो. बऱ्याचवेळा लोकं घराची सजावट करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासोबतच वास्तू दोष आणि गरिबी यासारख्या समस्याही घरात जन्म घेतात. देवाचा फोटो घरात लावतानाही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. असं वास्तुशास्त्र सांगते.

श्रावण महिन्यात शिव शंकराचा फोटो (Lord Shiva) लावताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक लोकं भक्ती आणि भावनेच्या भरात चुकीच्या ठिकाणी फोटो लावतात, त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. वास्तूनुसार भगवान शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Vastu tips in marathi, directions problems remedy
''राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सूचना फलक लावणार''

भगवान शंकराची ही मूर्ती घरात अजिबात ठेवू नका

भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, गरीब घरातून निघून जाते असा समज आहे. घरात सकारात्मक वातावरण निर्णाण होते, लोकांचे आरोग्य चांगले राहते. अनेक वेळा भगवान शंकराची पूजा करूनही माणसाची प्रगती होत नाही, घरात सुख-समृद्धी येत नाही. याचे कारण घरामध्ये स्थापित केलेली भगवान शंकराची उग्र स्वरूपाची मूर्ती हे कारण असू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये भगवान शिवाच्या उग्र रूपाचे चित्र व्यक्तीला गरीबांच्या दिशेने घेऊन जाते. घरामध्ये असे चित्र लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरातील लोकांची चिडचिड होते आणि घरातील शांतता भंग पावते.

भगवान शंकराची ही मूर्ती मानली जोत अत्यंत शुभ

घरात एकट्या भगवान शिव यांचे चित्र ठेवण्यापेक्षा माता पार्वतीचे चित्र लावणे चांगले मानले जाते. या चित्रावर शिवाची कृपा कायम आहे. लक्ष्मीचा वास आहे. सुख-शांतीचे वातावरण आहे. गरीब व्यक्ती घरातून दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. असे मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com