Navratri Vrat For Diabetes: मधुमेहाच्या रूग्णांनी उपवासात काय खावे अन् काय नाही? वाचा एका क्लिकवर

Navratri Vrat For Diabetes: उपवास करतांना मधुमेहींनी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Diabetes Diet
Diabetes DietDainik Gomantak
Published on
Updated on

What to Eat on Navratri Vrat For Diabetes: देशभरात शारदीय नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात नवरात्रीच्या दिवसांना खूप महत्त्व आहे. या काळात व्रत ठेवणे शुभ मानले जाते. 

मोठ्या संख्येने लोक नवरात्रीचे उपवास करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपवास थोडा त्रासदायक आहे. कारण फळांच्या आहारातील बहुतेक गोष्टी गोड असतात. ज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतात.

अशी काही फळे आहेत जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. यामुळे मधुमेही रूग्णांनी आहारात काय खावे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीच्या उपवासात त्या लोकांनी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.

चेरी ऐवजी खा संत्री

चेरीमध्ये भरपुर साखर असते. ज्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढु शकते. त्याऐवजी संत्र्याचे सेवन अधिक फायदेशीर मानले जाते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यात इतरही अनेक पोषक घटक आढळतात. संत्र्यामध्येही पाण्याचे प्रमाण जास्त असते.यामुळे शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहते.

अननस नव्हे तर नाशपाती

मधुमेहींनी उपवासादरम्यान अननस खाणे टाळावे. त्यात असलेली साखर मधुमेहींसाठी गातक ठरू शकते. त्याऐवजी नाशपाती खाणे आरोग्यदायी मानले जाते. त्यात अननसापेक्षा कमी साखर असते. नाशपाती फायदेशीर मानली जाते, कारण त्यात शरीराला आवश्यक असलेले भरपूर पोषक घटक असतात.

लिची ऐवजी पपईचे करा सेवन

नवरात्रीच्या उपवासात मधुमेहाच्या रुग्णांनी लिची खाऊ नये. कारण लिचीमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. हे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका अधिक असतो. त्याऐवजी पपईचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पपईमुळे मधुमेहाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी होतो.

चिकु न खाता पेरू खावे

चिकुमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासात मधुमेहाच्या रुग्णांनी या फळांचे सेवन करू नये. या फळाच्या अतिसेवनाने रक्तातील साखर वाढू शकते. त्याऐवजी पेरू फायदेशीर ठरू शकतो. पेरू खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते त्यामुळे भूक लागत नाही.

सफरचंद न खाता केळी

केळी खाणे आरोग्य आणि त्वचेसाठी फायगेशीर असते. पण मधुमेहींसाठी केळी लाभदायी नसते. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी उपवासा दरम्यान केळी ऐवजी सफरचंदाचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com