Navratri 2023 Skin Care Tips: यंदा 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. सर्वत्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उपवास आणि उपासना तसेच पोशाख आणि मेकअप कसा करावा याचीही काळजी घेतली जाते.
नवरात्रोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. तुम्ही चमकदार त्वचेसाठी पुढे सांगितलेल्या काही ब्युटी टिप्स फॉलो करू शकता.
स्टेप 1
क्लींजिंग करणे
सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिले आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. यासाठी फेस वॉशचा वापर करणे चेहऱ्यासाठी चांगले असते. बाजारात चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट मिळतात.
स्टेप 2
टोनिंग
चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्याला टोनिंग करावे. टोनर पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते.
स्टेप 3
सीरमचा वापर
टोनर व्यतिरिक्त सीरम त्वचेला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते. सीरममध्ये असलेले गुणधर्म त्वचेला चमकदार करण्याचे काम करतात. बाजारात अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत, म्हणून ते निवडताना त्वचेचा टाईप लक्षात ठेवावा.
स्टेप 4
मॉइश्चरायझर
त्वचा चमकदार बनवण्यासाठी ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. जर त्वचेत ओलावा नसेल तर ती कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे त्वचेवर खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर नियमितपणे लावावे.
स्टेप 5
सनस्क्रीन
त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन केवळ उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करत नाही तर प्रदूषणापासून बचाव करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.