Navratri Special Food 2023: देशभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लोकांनी घराची साफसफाई करून दुर्गा मातेच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस विधीपुर्वक आणि मनोभावे दुर्गा मातेची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.
घटस्थापनेसोबतच भाविक विविध पदार्थ तयार करून मातेला भोग अर्पण करतात. जाणून घेऊया नवरात्रीत दुर्गा मातेला कोणते पदार्थ अर्पण करावेत.
देव आणि देवतांना नारळ प्रिय आहे. नारळापासून बर्फी बनवून दुर्गा देवीला अर्पण करावी. नारळ बर्फी अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून इतरांमध्ये वाटले पाहिजे.
नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला हलवा बनवला जातो. बदामाचा हलवा दुर्गा देवीला अर्पण करावा. तसेच काही फळं देखील अर्पण करू शकता.
नवरात्रीत मखाणा खीर दुर्गा देवीला अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नवरात्रीत उपवास करणारे लोक देखील मखाणा खीर देखील खाऊ शकतात.
अनेक लोक उपवासा दरम्यान साबुदाणा वापरतात. साबुदाण्याची खीर बनवून दुर्गा देवीला अर्पण करू शकता. ही खीर बनवणे अगदी सोपे आहे.
दुर्गा देवीला खव्यापासून बनवलेले पदार्थ आवडतात. यामुळे नवरात्रीत काजू आणि खव्यापासून तयार केलेली काजू कथली अर्पण करावी.
मिल्क केक दुधापासून तयार केलेला हा गोड पदार्थ देवीला अर्पण करावा. हे दुधापासून बनवलेले असल्याने दुर्गा देवीला अर्पण करू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.