DIY Nail Paint Remover : लग्न, पार्टी किंवा कोणत्याही लहान-मोठ्या फंक्शनला जायचे असो, मुली आणि महिलांना मेकअपसोबतच नखांचा मेकओव्हर करणे आवडते. कारण त्यामुळे नखे अधिक सुंदर दिसतात आणि लांब आणि सुंदर नेलपॉलिशमध्ये रंगवलेली नखे हात आणि पायांचे सौंदर्य वाढवतात.
प्रत्येकाला ड्रेसला मॅच करण्यासाठी नेलपॉलिश लावायला आवडते. महिला वेगळे आणि सुंदर दिसण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. पण हे नेल पॉलिश काढताना मात्र थोडा त्रास होऊ शकतो. (DIY Nail Paint Remover)
नेल पेंट खरवडून काढण्याची गरज नाही
अशा परिस्थितीत हातांसाठी नखे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, पण तुम्हाला अचानक कुठेतरी जावं लागलं आणि जुने नेल पेंट काढण्यासाठी तुमच्याकडे रिमूव्हर नसेल तर? अनेक वेळा नेलपॉलिश रिमूव्हर संपतो आणि तेही आपल्याला आठवत नाही. आता अशा स्थितीत नेलपॉलिश खरवडून काढण्याची गरज नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगतो ज्या तुम्हाला मदत करू शकतात, या टिप्स तुम्हाला रिमूव्हरशिवाय नेल पेंटपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.
परफ्यूमने नेल पेंट सहज उतरेल
डिओडोरंट आणि परफ्यूम दोन्ही नेलपॉलिश रिमूव्हर म्हणून काम करतात. थोड्याशा कापसात परफ्यूम लावून नखांवर चोळा. नेलपॉलिश काही वेळात निघून जाईल.
अल्कोहोल नेल पेंट काढून टाकेल
तुमच्या घरात दारू असेल तर ती कापसावर घेऊन नखांवर हलक्या हाताने चोळा. असे केल्याने नेल पेंट सहज निघून जाईल.
लिंबाच्या रसाची मदत घ्या
व्हिनेगरमध्ये अॅसिड असते. ते वापरण्यासाठी त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि नंतर कापसाच्या मदतीने नखांवर लावा, यामुळे नेलपॉलिश निघू शकते.
टूथपेस्ट
टूथपेस्टने नेल पेंट काढता येतो. टूथपेस्टमध्ये असलेले इथाइल एसीटेट काही मिनिटांत नेल पेंट काढून टाकते. नेलपॉलिश रिमूव्हरमध्येही इथाइल एसीटेटचा वापर केला जातो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.