Toast Pizza Recipe: सकाळच्या वेळी ब्रेकफास्ट बनवण्यासाठी आपण नेहमी अशा रेसिपींच्या शोधात असतो, ज्या झटपट तयार होतात. अशीच एक रेसिपी म्हणजे टोस्ट पिझ्झा, ही रेसिपी इतकी सोपी आहे की ती 20 मिनिटांत तयार होऊ शकते. मुलांना ही डिश खायला खूप आवडेल. फक्त नाश्त्यासाठीच नाही तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इव्हनिंग स्नॅक्स म्हणूनही संध्याकाळच्या चहासोबतही ही रेसिपीचा आस्वाद घेउ शकता. लहान मुलांना बर्याचदा स्नॅक्स खाण्याची क्रेविंग होते. चला तर जाणून घेऊया ही रेसिपी कशी बनवायची
टोस्ट पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
ब्रेड
चीज
शिमला मिर्ची
कांदा
गाजर
टोमॅटो
कोथिंबीर
पनीर
मीठ
काळी मिरी पावडर
बटर
टोस्ट पिझ्झा बनवण्याची कृती
हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात पहिले भाज्या धुवून बारीक चिरून घ्या. आता एक नॉन-स्टिक तवा घ्या आणि त्यावर ब्राऊन ब्रेड बेक करा. ब्रेड जास्त वेळ बेक करण्याची गरज नाही. यानंतर त्यावर सॉस लावा. नंतर पनीर किसून त्यावर ठेवा. आता तुम्हाला सर्व भाज्या घालाव्या लागतील. तुम्ही यात स्वीट कॉर्न देखील टाकू शकता. नंतर चीज, मीठ, काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर घाला. पाच मिनिटे मायक्रोवेव्ह करा. तुमची रेसिपी तयार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही ब्रेड तव्यावरही बेक करू शकता. यासाठी ब्रेड तव्यावर ठेवा आणि प्लेटने झाकून ठेवा. गॅस फक्त मध्यम आचेवर ठेवा. झटपट तयार होणारे हे टोस्ट पिझ्झा गरमा गरम सर्व्ह करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.