Tips For Diabetic Patient: पावसाळा ऋतु आला की आपल्याला निसर्गाचे प्रसन्न रुप पाहायला मिळते. यात अनेकविध चविष्ठ पदार्थाची भर पडते. भारताची खाद्यसंस्कृती इतकी समृद्ध आहे की, आपल्याला ऋतुनुसार विविध चविष्ठ पदार्थांची चव चाखायला मिळते.
निसर्गाचे फुललेले सौंदर्य आणि नानाविध पदार्थ याशिवाय हा पाऊस विविध आजारदेखील घेऊन येतो. त्यामुळे सर्वांनीच हा ऋतु साजरा करताना आपली काळजी घेणे महत्वाचे ठरते. ज्याप्रकारे पावसाळ्यात नवीन आजार होऊ नये म्हणून स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे ठरते त्याचप्रमाणे आपल्याला आधीपासून असलेल्या आजारामध्ये वाढ होऊ नये म्हणूनदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.
तज्ञांनी म्हटल्यानुसार, मधुमेहाच्या रुग्णांना इतरांच्या तुलनेत स्वत:ची जास्त काळजी घेणे भाग असते कारण त्यांची प्रतिकारशक्ती या ऋतुत कमी होते. त्यामुळे ते लवकर आजारी पडतात. म्हणून आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याची माहीती घेणार आहोत.
1. मधुमेहाच्या रुग्णाने पावसाळ्यात बाहेरचे अजिबात खाऊ नये. त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची भीती आहे. घरात बनवलेले शुद्ध आणि स्वच्छ अन्नच खावे. अशा हवामानात तुम्ही कमी शिजवलेले अन्न खाणेही टाळावे. अशा प्रकारे संसर्ग टाळला जाऊ शकतो.
2. जेव्हा तुम्ही घरी फळे आणि भाज्या आणता तेव्हा ते पाण्याने चांगले धुवा आणि मगच खाण्यासाठी त्याचा वापर करा. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर हे खूप महत्वाचे आहेच मात्र इतरांनीदेखील याचा काही भाज्या गरम पाण्यात उकळल्याशिवाय वापरू नका.
3. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर पावसात स्वतःला कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच पावसाच्या पाण्यात सतत भिजणे टाळावे. पावसात भिजला तरी लगेच कोरडे कपडे आणि बूट घाला. मधुमेहामध्ये पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला संसर्गापासून दूर ठेवेल.
4. साखरेच्या रुग्णांनी पावसाळ्यात जीवनसत्त्वे समृध्द असलेले अन्न आणि पेये सेवन करावीत. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि वाढेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.