Cauliflower Samosa: पावसाची मज्जा द्विगुणीत करण्यासाठी घ्या बंगाली स्टाईल पदार्थांचा आस्वाद

तुम्ही बटाट्याचे सारण असलेला समोसा खाल्ला असेलच पण कधी फुलकोबी समोसा ट्राय केला आहे का?
Samosa
SamosaDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Recipe: पावसाळा सुरू होताच वाफाळलेला चहा गरमा गरम भजी खाण्याचा मोह कोणाला होणार नाही. तुम्ही अनेकवेळा चहा सोबत बटाट्यापासून बनवलेले समोस्याचा आस्वाद घेतला असेलच पण कधी जी फुलकोबी, बटाटे आणि शेंगदाणे सोबत विविध प्रकारच्या मसाल्यांचा वापर करून तयार केलेला समोसा ट्राय केला आहे का? ही खास आणि टेस्टी रेसिपी हे बंगाली स्टाईलचा समोसा आहे, ज्याला फुलकोपीर सिंगारा म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा बंगाल स्पेशल फुलकोबी समोसा.

  • फुलकोबी समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

फुलकोबी

मैदा

तुप

चवीनुसार मीठ

बटाटे

तेल

हिरवी मिरची

हिंग

शेंगदाणे

Samosa
Belly Fat: 'हा' योगप्रकार झटक्यात कमी करेल बेली फॅट

कृती

बंगाली स्टाइल फुलकोबी समोसा बनवण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात मैदा, तूप, मीठ आणि साखर घालून पीठ चांगले मळून घ्यावे. आता हे पीठ ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर फुलकोबी आणि बटाटे लहान चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवावे.

नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात लाल मिरच्या, हिंग, हिरवी मिरची, शेंगदाणे घालून सर्व काही नीट मिक्स करून घ्या. नंतर कोबी आणि बटाटे सोबत मीठ आणि साखर घालून एकत्र शिजवा. आता कढईत मसाला घाला आणि सर्व गोष्टी पदार्थ मिक्स करा.

यानंतर पिठाचा एक भाग काढून त्याचा शंकूचा आकार द्यावा. त्यात तयार केलेले बटाट्याचे सारण भरून कडा बंद करा आणि समोसे सोनेरी होईपर्यंत तळावे. तुमचा चविष्ट बंगाली फुलकोबी समोसा तयार आहे. हे गरमा गरम समोसे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत सर्व्ह करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com